धक्कादायक, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळला

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:50 PM, 18 Jan 2021
धक्कादायक, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळला
Breaking News

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय. अंकुर अग्रवाल (Ankur Agrawal) असं या भावाचं नाव आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये हा मृतदेह आढळला. त्यामुळे लव अग्रवाल यांना मोठा कौटुंबिक धक्का बसलाय (Ankur Agarwal dead body with bullet found in Saharanpur).

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल मागील काही काळापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल देशाला माहिती देण्यासाठी अनेकदा वृत्त वाहिन्यांना पाहायला मिळाले आहेत. त्यांच्या घरातील व्यक्तीचा असा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजीलय. अंकुर अग्रवाल यांचा मृतदेह लखनी परिसरात सापडला. मृतदेहाजवळ परवाना असलेला पिस्तुल मिळाला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केलाय. ही घटना सरसावा पोलीस स्टेशन क्षेत्रातील पिलखनी इंडस्ट्रियल भागातील आहे.

अंकुर अग्रवाल यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही जण ही आत्महत्या असल्याचा अंदाज लावत आहेत, तर काही लोक ही हत्या असल्याचंही बोलत आहेत. मात्र, सत्य पोलीस तपासतच पुढे येणार आहे.

Ankur Agarwal dead body with bullet found in Saharanpur