शौर्य पुरस्कारांची घोषणा, नायक देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र, ८ जवानांना शौर्य चक्र, तर सैन्याच्या डॉगचाही मरणोतत्तर सन्मान
भारतीय सैन्यातील हल्ला करणाऱ्या बेल्जियन मेलिनोईस डॉग एक्सेल यालाही मरणोत्तर वीरता पुरस्कार मेन्शन इन डिस्पेचेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानात या डॉगने केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची( bravery awards) घोषणा केली आहे. या स्वातंत्र्यदिनी नायक देवेंद्र प्रताप सिंह यांना देशातील दुसऱ्या सर्वोच्च शातीकालीन शौर्य पुरस्कार कीर्ती चक्राने(Kirti Chakra to hero Devendra Pratap Singh) सन्मानित करण्यात आले आहे. नायक देवेंद्र प्रताप सिंह हे यावर्षी २९ जानेवारीला झालेल्या पुलवामातील एका ऑपरेशनमध्ये सहभागी होते. तिथे त्यांनी शौर्याची पराकाष्टा करत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्यासह ८ जवानांना शौर्य चक्र(Shaurya Chakra) प्रदान करण्यात आले आहेत. त्यात शिपाई कर्ण वीर सिंह, गनर जसबीर सिंह यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. यासह शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त जवानांमध्ये मेजर नितीन धानिया, अमित दहिया, संदीप कुमार, अभिषेक सिंह, हवालदार घनश्याम आणि लान्स नायक राघवेंद्र सिंह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
डॉग एक्सेल यालाही शौर्यासाठी पुरस्कार
भारतीय सैन्यातील हल्ला करणाऱ्या बेल्जियन मेलिनोईस डॉग एक्सेल यालाही मरणोत्तर वीरता पुरस्कार मेन्शन इन डिस्पेचेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानात या डॉगने केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Indian Army’s assault dog Axel was posthumously awarded ‘Mention-in-Despatches’ gallantry award on this Independence Day for his role in a counter-terrorist operation in Jammu and Kashmir last month pic.twitter.com/RdshpqIiZh
— ANI (@ANI) August 14, 2022
नेमके काय घडले होते
३१ जुलै रोजी बारामुलाच्या वानीगाममध्ये भारतीय सैन्यदलाचे आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु होती. त्यात डॉग स्कॉडचाही सहभाग होता. या मोहिमेत डॉग एक्सेलच्या पाठीवर एक कॅमेरा लावण्यात आला होता. त्याला ज्यावेळी या खोलीत सोडण्यात आले, त्यावेळी त्याच्या हालचालींसोबत दहशतवाद्यांचा योग्य ठावठिकाणा सैन्यापर्यंत मिळू शकेल अशी योजना होता. असे झाल्यास सहजपणे या दहशतवाद्यांना टिपता येणे शक्य होणार होते. एक्सेल जसाही दहशतवादी असलेल्या खोलीत गेला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने त्याचा जीव गेला. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की असाल्ट डॉग्सना विशेष प्रशिक्षण दिलेले असते, त्यामुळे ते संशयिताला पकडू शकतात.
गोळी लागल्यानंतरही एक्सेलने केला मुकाबला
एक्सेल त्या घरातील एकेका खोलीत जात होता. त्याने एक खोली क्लीअर केली, पण तो दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळ्यांचे आवाज ऐकल्यानंतर सैनिक सावध झाले. त्यांनी त्या खोलीत लपलेल्या दहशतवाद्याला ठार केले. पण त्या दहशतवाद्याच्या गोळीबारात एक्सेलचा जीव गेला. एक्सेलच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये गोळी लागण्यासह त्याच्या शरिरावर वेगवेगळ्या जखमाही सापडल्या आहेत. याचा अर्थ गोळी लागल्यानंतरही त्याने दहशतवाद्यांशी मुकाबला केला होता. त्यामुळेच त्याच्या शरिरावर जखमा झाल्या होत्या.
