मुलांसाठी आता हवा Apaar ID Card चा आधार! करा लवकर हे काम

Apaar ID Card | अपार आयडी कार्डला महत्व आहे. हे कार्ड विद्यार्थ्यांची शिक्षणपत्रिकाच असेल. त्याची इत्यंभूत माहिती या कार्डमध्ये असेल. त्याची शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्याची माहिती या कार्डमध्ये असेल. हे कार्ड कसे तयार करण्यात येणार याविषयी अजून काही जण संभ्रमात आहे. कुठे वापर होणार या कार्डचा?

मुलांसाठी आता हवा Apaar ID Card चा आधार! करा लवकर हे काम
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 2:44 PM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने गेल्या 10-12 वर्षांत आधार कार्ड तयार करण्यासाठी मोठी कवायत केली. देशातील अनेक जणांनी आधार कार्ड तयार केले. आधुनिक काळासाठी हा दस्तावेज महत्वाचा आहे. आधार कार्डमुळे अनेक सरकारी कामे, खाते उघडण्याचे काम सोपे झाले आहे. आता विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने अपार कार्ड तयार करण्याची कवायत करण्यात येणार आहे. अपार कार्ड केवळ मुलांसाठी आहे. त्याचा त्याला मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड महत्वाचे ठरणार आहे. अपार कार्ड हे एक राष्ट्र , एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारीत ओळखपत्र आहे. कुठे होणार त्याचा वापर, काय होईल फायदा, हे जाणून घेऊयात..

आधारसारखेच पॉवरफुल अपार कार्ड

घरातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींसाठी अपार कार्ड महत्वाचे आहे. भविष्यात हा एक अत्यंत आवश्यक दस्तावेज ठरणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी असतील. त्याची क्रीडा क्षेत्रातील निपुणता यामध्ये नोंदवला जाईल. लवकरच विविध शाळांमध्ये अपार कार्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयीची पण माहिती नोंदवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन

अपार कार्ड तयार करण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुठेही धक्के खाण्याची, लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

  • Academic Bank of Credit वर त्याची नोंदणी करण्यात येणार आहे.
  • ABC च्या साईटवर गेल्यावर My Account वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर विद्यार्थी हा पर्याय निवडा. या ठिकाणी साईन-अप करा.
  • त्यासाठी आधार कार्ड क्रमांक संख्या, मोबाईल क्रमांकाची नोंद करा.
  • त्यानंतर डिजीलॉकर खाते उघडेल. डिजीलॉकर लॉगिन करा.

असे असेल अपार कार्ड

  • विद्यार्थ्यांना अपार कार्डच्या नोंदणीसाठी एक अर्ज देण्यात येईल
  • देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्ड तयार करण्यात येतील
  • विद्यार्थ्यांना 12 अंकांचे अपार कार्ड देण्यात येणार आहे
  • विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा आधार कार्ड यांची नोंद होणार
  • या अपार कार्डवर, 12 अंकी कार्ड क्रमांक, क्यूआर कोड असेल
Non Stop LIVE Update
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.