AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव

माणूस डिप्रेशनमध्ये असला की चुकीचे विचार त्याचा मनात येतात. यावेळी तो अनेक चुकीच्या गोष्टी करतो. कोलकातामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बायको सोडून गेली आणि व्यवसायात नुकसान झाल्याने तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. पण शेवटी एका बिर्याणीने त्याचा जीव वाचवला आहे.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 23, 2024 | 9:49 PM
Share

BIRYANI SAVE LIFE : बायको सोडून गेली म्हणून तो माणूस मरायला तयार झाला. कोलकाता पोलिसांनी एका व्यक्तीला भेटले जो आपल्या पत्नीने त्याला सोडून गेल्यामुळे आणि व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आपला जीव देण्यास निघाला होता. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील पुलावर चढून त्याने आत्महत्या करण्याची धमकी देत होता. पण त्या माणसाचा जीव बिर्याणीमुळे वाचला आहे. कोलकात्यात एक अशीच घटना समोर आली आहे. त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो मरण्यासाठी शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील एका पुलावर चढला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

ड्रामा पाहून पोलीस घटनास्थळी

हा सगळा ड्रामा सुरु असतानाच पोलीस तेथे पोहोचले. मग त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ती व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मुलीकडून समजले की त्या व्यक्तीला बिर्याणी खूप आवडते. पोलिसांनी त्याला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. यानंतर त्या व्यक्तीने पुलावरून खाली उतरून आत्महत्येचा बेत रद्द केला.

ही विचित्र घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यासाठी तो पुलावर देखील चढला. पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण तो वारंवार तेथून उडी मारण्याची धमकी देत ​​होता. तो आपल्या मुलीसह दुचाकीवरून सायन्स सिटीमार्गे जात होता. त्याने अचानक आपली कार पुलासमोर थांबवली आणि आपला फोन कुठेतरी पडल्याचे आपल्या मुलीला सांगितले. मी बघेन आणि परत येईन. यानंतर तो पुलावर चढला आणि तेथून उडी मारण्याची धमकी देऊ लागला.

मुलीने सांगितले वडिलांना आवडते बिर्याणी

या व्यक्तीच्या कृत्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गट आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीशी बोलणे सुरू केले पण तो ऐकायला तयारच होत नव्हता. पोलिसांनी त्याच्या मुलीशी चर्चा केली. मुलीने सांगितले की तिचे वडील डिप्रेशनमध्ये आहेत आणि तिची आई देखील तिच्या वडिलांना सोडून गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर ती व्यक्ती पुलावरून खाली उतरली.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...