AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बॅन मांजा’ विकल्यास…,’ जाणून घ्या काय आहे शिक्षा आणि नियम

पतंग उडवण्याच्या उत्साहात अनेकदा आपण जीवघेणा 'चायनीज मांजा' वापरतो. पण सरकारने या मांजावर बंदी घातली असून, तो विकणाऱ्यांवर कडक कारवाई होते. बॅन मांजा विकल्यास काय शिक्षा होते, हे ग्राहक म्हणून तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

'बॅन मांजा' विकल्यास...,' जाणून घ्या काय आहे शिक्षा आणि नियम
बॅन मांजा विकल्यास काय होते? जाणून घ्या काय आहे कायदा आणि शिक्षाImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Aug 03, 2025 | 6:31 PM
Share

पतंग उडवण्याची आवड अनेकांना असते, पण पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा ‘चायनीज मांजा’ किंवा ‘सिंथेटिक मांजा’ आता केवळ दोरा नसून एक जीवघेणं शस्त्र बनला आहे. या मांजामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात जीवही गेला आहे. या सर्व घटनांमुळे सरकारने या मांजावर कठोर बंदी घातली आहे. तरीही अनेक दुकानदार आणि ऑनलाइन विक्रेते तो छुप्या पद्धतीने विकतात. पण जर असा मांजा विकताना कुणी सापडला, तर त्याला काय शिक्षा होते, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे

बॅन मांजा विकल्यास काय होते?

बॅन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासन सातत्याने कारवाई करत असते.

1. गुन्हा दाखल होतो: जर एखादी व्यक्ती बॅन मांजा विकताना पकडली गेली, तर तिच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 (Environment Protection Act, 1986) आणि भारतीय न्याय संहिता (Indian Nyaya Sanhita) च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो.

2. अटक होऊ शकते: या प्रकरणात पोलीस आरोपीला थेट घरातून अटक करून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन जातात. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाते. काही प्रकरणांमध्ये जामीन मिळणेही कठीण होते.

3. दंडाची आणि तुरुंगावासाची शिक्षा: बॅन मांजा विकल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

4. दुकान सील होऊ शकते: काही प्रकरणांमध्ये, बॅन मांजा विकणाऱ्या दुकानदाराची दुकानंही सील केली जातात.

अपघात झाल्यास शिक्षा अधिक कठोर

जर या मांजामुळे कुणाला गंभीर दुखापत झाली किंवा दुर्दैवाने एखाद्याचा जीव गेला, तर शिक्षा आणखी कठोर होते. कोर्ट अशा दोषींवर सदोष मनुष्यवध (culpable homicide) किंवा निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात आणल्याचा आरोपही लावू शकते, ज्यामुळे शिक्षा खूप वाढू शकते.

हा मांजा फक्त माणसांसाठीच नाही, तर पक्ष्यांसाठीही खूप धोकादायक आहे. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होण्याचाही धोका असतो. म्हणूनच, सरकार यावर कठोर कारवाई करत आहे.

पतंग उडवण्याचा आनंद घ्या, पण स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी फक्त सुरक्षित आणि साध्या मांजाचा वापर करा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.