काँग्रेसचा पराभव का झाला?, अशोक चव्हाण करणार देशभरातील निकालाची समीक्षा

देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे (Ashok Chavan will give review on five state election results 2021)

काँग्रेसचा पराभव का झाला?, अशोक चव्हाण करणार देशभरातील निकालाची समीक्षा
अशोक चव्हाण, नेते, काँग्रेस
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 9:11 PM

मुंबई : देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील (Ashok Chavan will give review on five state election results 2021).

समिती पुढील 15 दिवसात अहवाल सादर करणार

देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील 15 दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल (Ashok Chavan will give review on five state election results 2021).

अशोक चव्हाणांकडून आभार व्यक्त

या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अभ्यासासाठी समिती स्थापन, 31 मे पर्यंत अहवाल देणार

पाच राज्यांमधील निवडणुकीचा निकाल काय?

1)  पश्चिम बंगाल

देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयाची हॅटट्रिक नोंदवली. मात्र 292 विधानसभा सदस्य असलेल्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर निसटता विजय मिळवला.

पश्चिम बंगालमध्ये 292 पैकी तृणमूलला 213, भाजप 77, काँग्रेस 00 आणि अन्य 01  अशा जागा मिळाल्या. बंगालमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन खेचून आणली आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी) (West Bengal Election Final result 2021)

  • तृणमूल काँग्रेस -213
  • काँग्रेस -00
  • डावे – 01
  • भाजप – 77
  • एकूण – 292

2) आसाममध्ये भाजपने गड राखला (Assam Election Final result 2021)

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला 60, काँग्रेसला 29, आसाम गण परिषद 9, एआययूडीएफ 16, बोडोलँड पीपल फ्रंट 04, युनायटेड पीपल्स पार्टी 06,  आणि अन्य 2 अशा जागांवर आघाडी मिळाली.

आसामधील पक्षीय बलाबल – 2021  

  • भाजप + – 75
  • काँग्रेस + – 50
  • अन्य – 1
  • एकूण – 126

3) तामिळनाडूमध्ये उलटफेर (Tamil Nadu Election Final result 2021) 

तामिळनाडू विधानसभेत  मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसला आहे. DMK ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. DMK ने यापैकी 133 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी AIDMK ला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021 

  • DMK –  133
  • AIDMK – 66
  • काँग्रेस – 18
  • भाजप – 4
  • अन्य – 13
  • एकूण – 234

4) केरळमध्ये डाव्यांनी गड राखला (Kerla Election Final result 2021)

केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला.  140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 94, काँग्रेसने 39, भाजप 00 आणि अपक्ष-इतर 06 असं चित्र पाहायला मिळालं.

केरळमधील पक्षीय बलाबल 2021 

  • LDF – 94
  • काँग्रेस –  39
  • भाजप – 00
  • इतर – 07
  • एकूण – 140

5) पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल (Puducherry Election final result 2021 )

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. 30 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये NDA ला 16, काँग्रेस  आणि मित्रपक्ष 08, इतर 6

पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021

  • NDA -16
  • काँग्रेस – 02
  • DMK – 06
  • इतर – 06
  • एकूण 30
Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.