काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अशोक गहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काय होणार?

वनिता कांबळे

Updated on: Sep 29, 2022 | 3:30 PM

अशोक गहलोत यांनी दिल्लीत हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर गहलोत यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अशोक गहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काय होणार?
Image Credit source: social media

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर राजस्थानमध्ये मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला. यानंतर अशोक गहलोत नरमले आहेत. अशोक गहलोत( (Ashok Gehlot) ) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून(election of Congress president) माघार घेतली आहे. अशोक गहलोत यांनी स्वत: निवडणुक न लढवण्याची घोषणा केली आहे.

अशोक गहलोत यांनी दिल्लीत हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर गहलोत यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. सध्या निर्माण झालेला राजकीय पेच पाहता मी अध्यक्षपदाची निवडणुक लढवणार नाही असे गहलोत यांनी जाहीर केले.

एक व्यक्ती, एक पद हे कॉंग्रेसचे धोरण अआहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.

मात्र, आता अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद सुरक्षित राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्रीपदाबाबातचा निर्णय सोनिया गांधी घेतील असे गहलोत यांनी यावेळी सांगीतले.

नेमकं काय घडल होत राजस्थानमध्ये?

राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.  यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार होते.

मात्र, अशोक गहलोत हेच मुख्यमंत्री रहावेत अशी ईच्छा आमदारांची व्यक्त केली. तर, याबाबत झालेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसच्या 92 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले होते. तर, सचिन पायलट यांना केवळ 10 आमदारांचा पाठिंबा होता.

यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरुन घमसान सुरु झाले होते. या काँग्रेस पक्षातील या अंतर्गत राजकीय सत्ता संघर्षाबाबात सोनिया गांधी यांनी नाराजी वक्त केली होती.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI