IAS अधिकारी अशोक खेमका यांची 27 वर्षातील 52 वी बदली

हरयाणा : हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने 1991 बॅचचे वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी अशोक खेमका यांच्यासह 9 आयएएस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली केली आहे. रविवारी सरकारकडून हे आदेश प्रसिद्ध करण्यात आले. अशोक खेमका हे सध्या क्रीडा मंत्रालयाचे प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. खेमका यांची आता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून, याआधीही …

IAS अधिकारी अशोक खेमका यांची 27 वर्षातील 52 वी बदली

हरयाणा : हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने 1991 बॅचचे वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी अशोक खेमका यांच्यासह 9 आयएएस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली केली आहे. रविवारी सरकारकडून हे आदेश प्रसिद्ध करण्यात आले. अशोक खेमका हे सध्या क्रीडा मंत्रालयाचे प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. खेमका यांची आता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून, याआधीही त्यांनी या पदावर काम केलं आहे. अशोक खेमका यांनी जवळपास 15 महिने क्रीडा मंत्रालयात काम केलं.

कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खेमका यांच्या 27 वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीतील त्यांची ही 52 वी बदली आहे.

वाड्रा प्रकरणामुळे चर्चेत

IAS अधिकारी अशोक खेमका यांचे नाव 2012 मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित असलेल्या डीएलएफ कंपनीच्या जमिनीचा करार रद्द केला होता. खेमका यांच्यासह IAS अमित झा, सिद्धिनाथ रॉय, राजीव अरोरा, अमित कुमार अग्रवाल, वजीर सिंह गोयात, चंद्र शेखर आणि विजय कुमार सिद्दप्पा यांची बदली करण्यात आली आहे.

अशोक खेमका यांची 52 बदली असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आज प्रशासनात खेमकांसारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी सापडणे कठीण आहे. मात्र, अशा इमानदार अधिकाऱ्यांवर सरकारकडून नेहमीच बदली केली जाते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *