AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार… आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा

Assam Himanta Biswa Sarma Government big decision: पहिल्या पत्नीची परवानगी न घेता दुसरे लग्न करणाऱ्या, गुपचूप लग्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आसाम राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात होणार आहे. काय आहे हा निर्णय ज्याची देशभरात चर्चा सुरू आहे?

आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार... आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा
आसाम सरकारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 18, 2026 | 5:55 PM
Share

कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. आसाममधील हिंमता बिस्वा सरमा सरकारने अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम थेट त्यांच्या पहिल्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा आज करण्यात आली. हा नियम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे गुपचूप लग्न करणारे अथवा पहिल्या पत्नीवर दबाव टाकून दुसरे लग्न करणारे कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. या निर्णयाची आता देशात चर्चा सुरू झाली आहे. भाजप शासित राज्यात हा निर्णय लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हिंमता सरकारचे धडाकेबाज निर्णय

एकापेक्षा अधिक विवाहावंर अगोदरच बंदी

आसामध्ये समान नागरी संहिता(UGC) लागू आहे. एकापेक्षा अधिक विवाहांवर तिथे निर्बंध घालण्यात आले आहेत. आता त्यापुढे एक पाऊल टाकत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कायदेशीर प्रक्रिया न राबवता दुसरे लग्न झाले असेल त्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम पहिल्या पत्नीला देण्यात येणार आहे. सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने आणि महिला अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हिंमता सरकारचे हे मोठे पाऊल मानल्या जात आहे.

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका

यापूर्वी पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही सरकारने मोठी कारवाई केली होती. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10-15 टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. भीतीपोटी अनेकांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्यास सुरूवात केल्याचे समोर आले होते. आता अनेक विवाह पद्धतीला नवीन निर्णयाने झटका बसण्याची शक्यता आहे.

आसामध्ये काही समुदायांमध्ये बहुविवाह पद्धती होती. काळाच्या ओघात या प्रथेला आळा बसला. काही ठिकाणी कायदेशीर निर्बंध आणून ही पद्धत बंद करण्यात आली. तरीही काही पुरूष कुटुंबाच्या दबावाखाली, अपत्याच्या हव्यासाने अथवा इतर कारणांमुळे दुसरा विवाह करत असल्याचे समोर आले होते. हा विवाह गुपचूप करण्यात येत होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आसाम सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांवर पहिला निर्बंध आणला आहे. तर पुढील टप्प्यात खासगी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जाऊ शकतो. या निर्णयाचे महिला वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.  आता या निर्णयाचा पहिला फटका कोणत्या कर्मचाऱ्याला बसतो याची कुजबूज शासकीय कार्यालयांमध्ये सुरू झाली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात