Astra Missile खूपच घातक, क्षणात शत्रूचा खेळ खल्लास,चीन-पाकिस्तानमध्ये खळबळ
डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. डीआरडीओ अलिकडेच सुखोई-30 MKI फायटर जेटच्या सहाय्याने Astra Beyond Visual Range Missile क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली आहे.

भारतीय वायूसेनेच्या भात्यात आता नवं अस्र दाखल झाले आहे. Astra Beyond Visual Range Missile हे क्षेपणास्र डागल्याचे कळण्याआधीच शत्रूचा खात्मा करते. जगात असे क्षेपणास्र बनविण्याची क्षमता केवळ अमेरिका, रशिया,युरोपियन युनियन आणि चीनजवळ आहे.पाकिस्तानला देखील चीनने अशी क्षेपणास्रे दिली आहेत. इस्राईलकडेही अशी क्षेपणास्र आहेत. जर रेंज आणि मारक क्षमतेत भारताचे क्षेपणास्र सर्वात प्रमुख आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.कारण हे क्षेपणास्र पाकिस्तान आणि चीनच्या हवाईहल्ल्याच्या प्रयत्नांना खूपच अचूकपणे नाकाम करु शकते.
DRDO ची कामगिरी
डीओरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओने गेल्या आठवड्यात ओडीशाच्या तटावरुन सुखोई-30 MKI वरुन BVRA म्हणजे बियॉन्ड विजुअल रेंज मिसाइल Astra ची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्राने अनेक टार्गेट ड्रोनला लक्ष्य करीत नष्ट केले आहे. याच सोबत डीआरडीओने एक क्वीक डिप्लोयबल 155 मिमी/52 कॅलिबर माऊंटेड गन सिस्टीम देखील तयार केली आहे. केवळ दोन मिनिटांहून कमी काळात ती फायर आणि मुव्हमेंट करते.
Astra रेंज काय ?
DRDO ने Astra च्या लाँच नंतर जाहीर केलेल्या स्टेटमेंटनुसार या क्षेपणास्राची रेंज 100 किलोमीटर पेक्षाही जास्त असून या टप्प्यातील टार्गेट ती नष्ट करु शकते. यात भारताने डिझाईन केलेले रेडिओ फ्रीक्वेन्सी सीकर आणि मॉर्डन गायडन्स सिस्टीमचा वापर केला आहे.
एक निशाना चुकला नाही…
चाचणी दरम्यान Astra मिसाईलची वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी दोन्ही स्थितीत या मिसाईलने अनेक हायस्पीड ड्रोनचा लक्ष्यभेद केला आहे.
चीनकडे कोणते मिसाईल?
चीनकडे या आपल्या Astra च्या मुकाबल्यासाठी BVRA कॅटगरीतील PL15 मिसाईल्स आहेत, चीनसह पाकिस्तानची वायू सेनाही याचा वापर करत असते. परंतू गेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगाने चीनच्या मिसाईलना फुस्स होताना पाहीले आहे.त्यानंतर चीनच्या अनेक डिफेन्स कंपन्यांचे शेअर कोलमडले होते.
Astra vs Pl 15
रेंज आणि वेगाचा विचार करता भारत आणि चीनच्या मिसाईलमध्ये किरकोळ फरक आगे. परंतू टेक्नॉलॉजी पातळीवर भारताच्या एस्ट्रा मिसाईलच्या अनेक व्हेरिएंटवर काम सुरु आहे. त्यात अनेक व्हेरीएंट हे चीनच्या PL 15 मिसाईलवरुन रडार,गायडन्स आणि Maneuverability बाबतीत सरस आहेत. तर अमेरिकेकडे याच्या तोडीस AIM-174 मिसाईल आहेत,जी रेंज आणि वेगाच्या बाबतीत भारताच्या Astra सारखीच आहे.
