AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाई, मोबाईल अन्… देशद्रोही रवी वर्माच्या काळ्याधंद्यांनी सर्वच चक्रावले; चौकशीत मोठी माहिती समोर?

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याचे काळेधंदे उघड झाले आहेत.

बाई, मोबाईल अन्... देशद्रोही रवी वर्माच्या काळ्याधंद्यांनी सर्वच चक्रावले; चौकशीत मोठी माहिती समोर?
Ravi VarmaImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 31, 2025 | 6:23 PM
Share

यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरण ताजं असतनाच महाराष्ट्र एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रविकुमार वर्माला अटक केली. ठाण्यातील कळवा येथे राहणारा रवी हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो. आता चौकशीत त्याने मोठा खुलासा केला आहे.

विशाखापट्टनममध्ये नव्या महिलेच्या संपर्कात

एटीएसने अटक केलेल्या रवी वर्माला आज मुंबईत आणण्यात आले. नागपाडा येथील एटीएस हेड क्वार्टरमध्ये त्याला ठेवण्यात आले. दुपारी जवळपास 2 तास त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी वर्मा हा विशाखापट्टनम येथील विजाग येथे गेला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कात प्रीती नावाची महिला आली होती. ऑक्टोबर 2024मध्ये रविकुमार आणि प्रीती जयस्वाल यांचा संपर्क आला.

वाचा: ठाण्यातील गद्दार रवी वर्माने 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकला कशी पाठवली?

रविकुमार हा नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून आउटसोर्सिंगद्वारे नोकरीला लागला होता. नेव्हलमध्ये रविकुमारचे व्हिडीओ कॉलवर काम अवलंबून असल्याने त्याला आत मोबाईल नेण्यास परवानगी होती. त्याचाच फायदा घेऊन रविकुमारने नेव्हल डॉकमधील महत्वाची 14 जहाजे आणि संवेदनशील माहितीची फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानातील मुलीला पाठवली होती. दरम्यान, एटीएस तर्फे रविकुमार वर्माबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

2024 पासून पाकच्या संपर्कात

रवी वर्मा नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवीय अशी मागणी रवी वर्माकडे होत होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता.

मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.