AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atul Rane : मराठमोळे मिसाईल मॅन अतुल राणेंची ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी वर्णी, डीआरडीओमधील 34 वर्षांच्या सेवेचा सन्मान

डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे (Atul Rane) यांनी सोमवारी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या (Brahmos Aerospace) सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

Atul Rane : मराठमोळे मिसाईल मॅन अतुल राणेंची ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी वर्णी, डीआरडीओमधील 34 वर्षांच्या सेवेचा सन्मान
Atul Rane ( Source: DRDO Twitter)
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 11:36 AM
Share

नवी दिल्ली: डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे (Atul Rane) यांनी सोमवारी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या (Brahmos Aerospace) सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते.

अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटर चं स्वदेशी डिझाईन बनवेणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअर च्या विकास आणि डिफेन्स अ‌ॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये 1987 पासून योगदान देत आहेत.

1987 पासून कार्यरत

अतुल राणे यांनी चेन्नईच्या Guindy Enginering College मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. 1987 मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसत होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-1 मिसाईलच बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.

ब्रम्होस निर्मितीच्या टीममध्ये सुरुवातीपासून कार्यरत

अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये कार्यरत आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.प

महाराष्ट्राशी विशेष कनेक्शन

अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांच मूळगाव आहे. चेन्नईत शिक्षण घेतल्यानंतर अतुल राणे यांनी पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

इतर बातम्या:

दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!

Atul Dinkar Rane appointed as Chief Executive Officer and Managing Director of Brahmos Aerospace

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.