Arun Govil : औरंगजेब, अकबर की हुमायूं? टीव्हीवरचा ‘राम’ अरुण गोविल यांच्यानुसार कोण चांगला शासक?
Arun Govil : टीवी9 भारतवर्ष ‘5 एडिटर्स’ शो मध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, हुमायूं, अकबर आणि औरंगजेब या तिघांपैकी चांगला शासक कोण? त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते वाचा.

समाजवादी पार्टीचे खासदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब क्रूर राजा नव्हता, तो एक चांगला शासक होता, असं अबू आझमी म्हणाले. आझमी यांना, त्यांच्या या वक्तव्यामुळे अधिवेशनकाळासाठी सभागृहातून निलंबित सुद्धा करण्यात आलं. आता मेरठचे भाजप खासदार आणि टीव्हीवरच्या ‘रामायण’ मालिकेमुळे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी औरंगजेब, अकबर की हुमायूं? या तिघांपैकी कोण चांगला शासक होता या प्रश्नाच उत्तर दिलय. अरुण गोविल यांनी ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारली होती. अरुण गोविल यांनी अकबर चांगला शासक असल्याच म्हटलं आहे.
टीवी9 भारतवर्ष ‘5 एडिटर्स’ शो मध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, हुमायूं, अकबर आणि औरंगजेब या तिघांपैकी चांगला शासक कोण? त्यावर त्यांनी अकबराचा नाव घेतलं. या तिघांमध्ये अकबर चांगला शासक होता असं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी आणखी काही प्रश्नांची सुद्धा उत्तर दिली. त्यांना श्यामा प्रसाद मुखर्जी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अरुण गोविल म्हणाले की, ‘दोघांच्या विचारांच वेगवेगळ क्षेत्र आहे’
‘तुलना करणं योग्य वाटत नाही’
“भारतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एका विशिष्ट धर्माला मानणाऱ्यांचा विचार केला तर श्यामा प्रसाद मुखर्जी” असं अरुण गोविल यांनी उत्तर दिलं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी सुद्धा भारताबद्दलच विचार केला, असं अरुण गोविल म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा विचार केला. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारताचा विचार केला” असं ते म्हणाले. “श्यामा प्रसाद मुखर्जी हे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांइतकेच महत्त्वाचे आहेत. माझ्या दृष्टीने मला दोघांमध्ये तुलना करणं योग्य वाटत नाही” असं अरुण गोविल म्हणाले.
त्यावेळी निवडणुकीचा विचार आला
राजकारणातील प्रवेशाबद्दल ते म्हणाले की, “राजकारणात येण्याची माझी इच्छा नव्हती. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी त्यांच्या मनात निवडणूक लढण्याचा विचार चमकून गेला” 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यावेळी ते अयोध्येत होते. “तिथे असताना माझ्या मनात विचार आला की, मी धार्मिक सेवा, अध्यात्मिक सेवा केलीय पण जनसेवा केलेली नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिकीटासाठी फोन आला” असं अरुण गोविल यांनी सांगितलं.