Putin India Visit : रशियाचं भारताला सर्वात मोठं गिफ्ट, पुतिन यांनी केली थेट घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांचं भारतामध्ये आगमन झालं. दरम्यान त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये रशिया आणि भारतादरम्यान अनेक करार झाले आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की भारत आणि रशियाच्या 23 व्या शिखर परिषदेमध्ये पुतिन यांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारत आणि रशियाची मैत्री अनेक ऐतिहासिक माईलस्टोनचा टप्पा पार करत असताना पुतिन यांचा हा भारत दौरा होत आहे. पुतिन यांच्या या भारत भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. विशेष: अमेरिकेचं सर्वात जास्त लक्ष पुतिन यांच्या या दौऱ्याकडे आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी त्यांची भूमिका आहे. मात्र भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरू आहे. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. रशियाकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी तेल पुरवठा कायम सुरूळीत सुरू राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, म्हणून अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे, मात्र आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे.
भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, दुसरीकडे रशियानं देखील भारताला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरलवर मोठी सूट देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, त्यानंतर आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
