डेहराडून: अचानक चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. उत्तराखंडच्या दौऱ्यावर आलेल्या बागेश्वर बाबांनी एक मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यातून त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. या व्हिडीओतून त्यांनी आपल्या देवभूमीतील दोन ते तीन दिवसाच्या दौऱ्याची माहिती दिली आहे. बागेश्वर बाबा अचानक गायब झाल्याची बातमी आली होती. यापार्श्वभूमीवर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बागेश्वर बाबा अचानक गायब झाले होते. त्यांचा मोबाईलही लागत नव्हता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, नव्या व्हिडीओ जारी करून त्यांनी देवभूमीत आल्याचं सांगतानाच बागेश्वर धाममध्ये यज्ञ होणार आहे. त्यासाठी तप करणाऱ्या साधू संतांना निमंत्रण देण्यासाठी इथे आल्याचं त्यांनी सांगितलं.