अडीच वर्षाच्या सृष्टीचा 48 तास संघर्ष, लष्कराने घेतली कमान पण आईचे अश्रू थांबेना

अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडून 40 तासांहून अधिक काळ लोटला आहे. 300 फूट खोल बोअरवेलमध्ये सृष्टी सुरक्षित असेल की नाही या विचारानेच सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडत आहे. सृष्टीला वाचविण्यासाठी जवान अथक प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तिच्या आईच्या डोळयातील अश्रू काही थांबत नाहीत.

अडीच वर्षाच्या सृष्टीचा 48 तास संघर्ष, लष्कराने घेतली कमान पण आईचे अश्रू थांबेना
BHOPAL SHRUSHTI Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 2:06 PM

भोपाळ : मध्यप्रदेशमधील सिहोर जिल्ह्यातील मुंगवली गावातील सृष्टी नावाची अडीच वर्षांची मुलगी 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सृष्टी बोअरवेलमध्ये पडल्यानंतर तिच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ४८ तास उलटूनही सृष्टीला बाहेर काढण्यात अदयाप यश आले नाही. सुरुवातीला सृष्टी बोअरवेलमध्ये सुमारे 40 फूट खोलीवर अडकली होती. परंतु, बचाव कार्यात गुंतलेल्या मशीनच्या कंपनामुळे ती आणखी 100 फूट खाली घसरली. त्यामुळे तिला बाहेर काढणे अधिक कठीण झाले आहे.

300 फूट बोअरवेलमध्ये सृष्टीला पडून 48 तासांहून अधिक काळ लोटला. सृष्टी बोअरवेलमध्ये 100 ते 150 फूट खोलवर अडकली आहे. घटनास्थळी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाचे अजूनही बचावकार्य सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सृष्टी हिने एकदा सैन्याने सोडलेली दोरी पकडली होती. यानंतर तिला वर ओढले जात होते. पण, थोड्या उंचीवर आल्यावर तिच्या हातातला दोर सुटला आणि सृष्टी पुन्हा आत पडली. आता ती 100 ते 150 फूट खोलवर अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला वर काढण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो असे बचावकार्य पथकाने सांगितले.

सृष्टी हिने दोर पकडल्यानंतर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, तिच्या हातातून दोर सुटल्याचे कळताच तिच्या आईच्या संयमाचा बांध फुटला. सृष्टीची आई एकच आकांत करत असून दोन दिवस तिने काहीही घेतले नाही. रेस्क्यू साईटवर बसून ती सतत रडत असते.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान स्वतः संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनीही घटनास्थळी पोहोचत सृष्टीच्या आई-वडिलांशी भेट घेतली. आम्ही बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण केले आहे. तर NDRF आणि SDERF च्या टीम आधीच मुलीच्या सुटकेसाठी काम करत आहेत. मुलीला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोअरवेलमधील पाईपद्वारे मुलीला ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. सध्या सुमारे 12 जेसीबी आणि पोकलेन मशीन बचाव कार्यात गुंतले आहेत. लष्कराचे एक पथकही बचावकार्यात सामील झाले आहे. पण, येथील कठीण खडकांमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....