शिक्षिकेचं मुंडण, केस राहुल गांधींना पाठवणार, कारण...

धरणे आंदोलनावर बसलेल्या शिक्षकांपैकी एका शिक्षिकेने आपले केस त्याग करत सार्वजनिकरित्या मुंडण केलं.

Teacher Shaved Her Head, शिक्षिकेचं मुंडण, केस राहुल गांधींना पाठवणार, कारण…

भोपाळ : भोपाळमध्ये गेल्या 72 दिवसांपासून शिक्षकांना नियमित करणाच्या मागणीसाठी शिक्षक धरणे आंदोलन करत आहेत (Female Teacher Shaved Her Head). मात्र, बुधवारी या आंदोलनाला एक भावनिक वळण आलं. धरणे आंदोलनावर बसलेल्या एका शिक्षिकेने आपले केस मुंडण करत ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवणार असल्याचा निर्णय घेतला.

मुंडण केलेल्या शिक्षिकेचं नाव डॉक्टर शाहीन खान आहे. गेल्या 2 डिसेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी मध्य प्रदेशचे शिक्षक धरणे आंदोलनावर बसले आहेत (Female Teacher Shaved Her Head).

आमचं भविष्य अंधारात : डॉक्टर शाहीन खान

“निवडणुकांनंतर सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. आम्ही वर्षभर वाट पाहिली. त्यानंतर आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, आम्हाला जागा रिकामी करण्यासंबंधी नोटीस देण्यात आल्या. आम्ही इथे गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत धरणे आंदोलनावर बसलो आहे. मात्र, सरकारने आमची दखल घेतली नाही. आम्ही मुलांना शिकवून त्यांचं भविष्य बनवलं. मात्र, आता आमचं स्वत:चं भविष्य अंधारात आहे. त्यामुळे लेखी आदेश मिळेपर्यंत आम्ही धरणे सोडणार नाही”, असं डॉक्टर शाहीन खान यांनी सांगितलं (Female Teacher Shaved Her Head).

‘शिक्षकांसाठी याहून दुख:द दिवस नाही’

दरम्यान, “शिक्षकांसाठी याहून दुख:द दिवस नसेल. कारण, इथे एका महिलेने तिच्या केसांचा त्याग केला. डॉक्टर शाहीन खान यांनी जे केस त्याग केले आहेत, ते आम्ही राहुल गांधींना पाठवू. जेणेकरुन त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती होत नसल्याचं त्यांना कळेल”, असं ‘अतिथी विद्वान नियमितीकरण संघर्ष मोर्चा’चे अध्यक्ष देवराज सिंह यांनी सांगितलं.

शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ सरकारवर निशाणा

या प्रकरणानंतर मध्य प्रदेशात राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. शिवराज सिंहांनी कमलनाथ यांचं फेब्रुवारी 2018 मधील जुनं ट्वीट शेअर केलं. त्यासोबत शिवराज सिंहांनी कमलनाथ यांना अनेक सवालही केले.

“मुख्यमंत्रीजी, आजही केस हे स्त्रीच्या सन्मानाचं प्रतीक आहे. शिक्षक भगिनींने तुमच्या झोपलेल्या सरकारला जागवण्यासाठी आपल्या केसांचा त्याग केला. तुम्हाला त्यांच्या दु:खाची कल्पना आहे? त्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही कुठला निर्णय घेणार?”, असं ट्वीट शिवराज सिंह यांनी केलं.

जेव्हा मध्य प्रदेशात शिवराज सिंहांची सरकार होती, तेव्हा कमलनाथ यांनी शिक्षिकांनी केलेल्या मुंडणावरुन शिवराज सिंहांवर टीका केली होती.

Female Teacher Shaved Her Head

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *