AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का! चीनने शरीफ यांची साथ सोडली, ‘या’ मुद्द्यावर भारताला दिला पाठिंबा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनला गेलेले आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली.

पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का! चीनने शरीफ यांची साथ सोडली, 'या' मुद्द्यावर भारताला दिला पाठिंबा
Modi and jinping
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 31, 2025 | 9:31 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनला गेलेले आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याचा भारतासह चीनलाही फटका बसू शकते असं मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चीनने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानला फटका बसला आहे.

चीनचा भारताला पाठिंबा

भारत बऱ्याच वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. भारताचा शत्रू देश पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत आहे, हेच दहशतवादी भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदींनी सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच याचा चीनलाही धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता चीनने याबाबत भारताला पाठिंबा दिला आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे म्हणाले की, ‘आज झालेल्या बैठकीप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारत आणि चीन या दोघांनाही याचा धोका आहे. त्यामुळे या दहशतवादाला तोंड देण्यासाठी आपण एकमेकांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी भारताला चीनचे सहकार्य मिळाले आहे.’

सीमावादावरही चर्चा

आज झालेल्या बैठकीत चीनसोबत असलेल्या सीमा वादावरही चर्चा झाली. सीमेवर शांतता राखणे हे भारत-चीन संबंधांसाठी महत्वाचे आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमधील सैन्यात तणाव निर्माण झाला होता, मात्र आता हा प्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता आहे.

चीनने दिला होता पाकिस्तानला पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यावेळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता, या तणावाच्या काळात तुर्की आणि चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. या काळात पाकिस्तानने चिनी लढाऊ विमाने आणि तुर्की ड्रोनचा वापर केला. मात्र काही दिवसांनंतर युद्धबंदी झाली. त्यानंतर आता दहशतवादाबाबत चीनने भारताला पाठिंबा दिला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा