AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आप सोडताच राघव चड्ढा यांना मोठा दणका, जनतेनेच दाखवली जागा; गेल्या 24 तासांत…

Raghav Chadha : राघव चड्ढा यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी आम आदी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आप सोडताच राघव चड्ढा यांना मोठा दणका, जनतेनेच दाखवली जागा; गेल्या 24 तासांत...
Raghav ChadhaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 25, 2026 | 6:33 PM
Share

खासदार राघव चड्ढा यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी आम आदी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये सामील होताच राघव चड्ढा यांना मोठा धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर ट्रेंड आणि ट्रोल होऊ लागले आहेत. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सवर झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम अकाउंट अनफॉलो करण्याची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 10 लाख लोकांनी त्यांनी अनफॉलो केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आतापर्यंत किती फॉलोअर्स कमी झाले?

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये जाण्यापूर्वी राघव चड्ढा यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 14.6 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र, पक्ष बदलल्यानंतर सुमारे 10 लाख लोकांनी त्यांना अनफॉलो केले आहे. आता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटून 13.5 मिलियनवर आली आहे. आता आगामी काळात त्यांनी आणखी नेटकरी अनफॉलो करू शकतात. नेटकरी त्यांच्या इंस्टाग्रामवर लक्ष ठेऊन आहेत. काही युजर्सचा दावा आहे की राघव यांनी भाजपशी संबंधित काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. मात्र याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

Gen Z ने सुरू केले अनफॉलो कॅम्पेन

राघव चड्ढा हे भाजपमध्ये सामील होताच Gen Z पिढीने सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, आमची फसवणूक झाली आहे. कारण एक काळ असा होता की अनेकांना वाटत होते की Gen Z साठी राघव चड्ढा यांच्यापेक्षा प्रामाणिक नेता दुसरा कोणी नाही. कारण ते सामान्य लोकांचे प्रश्न ठामपणे मांडत होते. त्यामुळे ते खासकरून तरूणांमध्ये लोकप्रिय झाले होते, मात्र आता याच तरुणांनी चड्ढा यांना मोठा दणका दिला आहे.

राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांचा आप पक्षाला रामराम

आम आदमी पक्षाचे राज्यसभेत 10 खासदार होते, त्यापैकी 7 खासदारांनी पक्ष सोडला आहे. याची घोषणा राघव चड्ढा यांनी शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत केली होती. यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल