AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरी की व्यवसाय, राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्डा काय करत होते? 22 व्या वर्षीच…

Who is Raghav Chadda : खासदार राघव चड्डा यांच्यासह आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्डा कोण आहेत? ते राजकारणात येण्यापूर्वी काय करत होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

नोकरी की व्यवसाय, राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्डा काय करत होते? 22 व्या वर्षीच...
Who is Raghav ChaddaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 24, 2026 | 6:07 PM
Share

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला असून 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार राघव चड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आप हायकमांड आणि राघव चड्ढा यांच्यात मतभेद सुरू होते. आज अखेर चड्डा यांनी आप सोडण्याचा निर्णय घेतला. राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली होती. राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्डा काय करत होते, ते सविस्तर जाणून घेऊयात.

2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्याशी भेट

अण्णा हजारे 2013 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी रामलीला मैदानावर अरविंद केजरीवालही अण्णांसोबत होते. त्यावेळी राघव चड्डा हे खूप तरूण होते. राघव चड्डा नुकतेच चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनले होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण करून भारतात परतले होते. त्याच दरम्यान त्यांची भेट अरविंद केजरीवाल यांच्याशी झाली आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

22 व्या वर्षीच…

राजकारणात येण्यापूर्वीही राघव चड्ढा यांच्या नावावर मोठी उपलब्धी होती. ते अवघ्या 22 व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट बनले होते. इतक्या कमी वयात ते देशातील हाय टॅक्स पेयर बनले होते. राघव चड्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचा निर्णय घेतला आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मल्टिनॅशनल ऑडिट आणि कन्सल्टिंग कंपनी डेलॉइट आणि थॉर्नटन यांच्यासाठीही काम केले.

आपचे खजीनदार

राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम दिल्ली जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या राहुल मेहरा यांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांना स्वतः अरविंद केजरीवाल यांनी दिली होती. आम आदमी पक्षाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 2013 मध्ये ते पक्षाच्या जाहीरनामा तयार करणाऱ्या टीमचे सदस्य होते. त्यानंतर काही काळासाठी त्यांना पक्षाचा खजीनदार देखील बनवण्यात आले होते.

अनेक मुद्यांवर उठवला आवाज

राघव चड्डा हे स्वयंसेवक म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात सामील झाले होते, मात्र कालांतराने ते अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी बनले. त्यानंतर ते आपचे युवा प्रवक्ते बनले आणि कालांतराने माध्यमांमध्ये पक्षाचा प्रमुख चेहरा बनले. पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला होता. आता त्यांनी केजरीवाल यांची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल