AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती होती तेच घडलं; युद्ध सुरू असताना भारताला सर्वात मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी

इराण इस्त्रायल अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका संपूर्ण जगालाच बसला आहे. मात्र या युद्धामुळे आता भारताचं जास्त नुकसान होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे.

ज्याची भीती होती तेच घडलं; युद्ध सुरू असताना भारताला सर्वात मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी
rupee vs dollarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 3:26 PM
Share

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला आहे. सध्या स्थितीमध्ये इराणकडून या मार्गाने केवळ मित्र राष्ट्रांच्याच जहाजांना जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. मध्य पूर्वेत उडालेल्या युद्धाच्या भडक्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. आता त्याचा थेट फटका भारताला बसताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय चलनामध्ये घसरण सुरूच असून, शुक्रवारी रुपयामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. रुपया पहिल्यांदाच प्रति डॉलर 94 रुपयांच्या पार पोहचला आहे. दिवसाच्या शेवटी काही वेळ रुपयाचं मूल्य हे प्रति डॉलर 94.84 वर पोहोचलं होतं, त्यानंतर रुपयामध्ये थोडी सुधारणा दिसून आली, त्यानंतर 94.81 रुपयांवर क्लोज झाला, ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.

परदेशी गुंतवणूकदार सातत्यानं कमी करत असलेली गुंतवणूक आणि इराण, अमेरिका, इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा भारतीय चलनावर मोठा परिणाम होत असल्याचं पहायला मिळत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या आर्थिक वर्षामध्ये रुपयात तब्बल 11 टक्के घसरण झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देखील रुपयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली नव्हती, हा नवा रेकॉर्ड तयार झाला आहे, त्यामुळे आता आर्थिक जगतामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

रुपयामध्ये घसरणीचं कारण काय?

अर्थतज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत बदल होत आहे, याचा मोठा परिणाम हा भारतीय चलनावर दिसून येत आहे, दरम्यान पुढील काही आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर असं झालं तर रुपयाच्या मुल्यामध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. यामुळे महागाई देखील वाढण्याची शक्यता आहे.

जगावर मोठं इंधन संकट 

दरम्यान या युद्धामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होमूर्ज बंद केल्यामुळे अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा आणि नॅचरल गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे.  भारताला देखील याचा मोठा फटका बसला आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'