AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाबाबत मध्य पूर्वेतून अत्यंत मोठी बातमी; इस्त्रायल, अमेरिकेची झोप उडाली, युद्ध आणखी 2 वर्ष सुरूच राहणार?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र आता मध्य पूर्वेतून एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडाली आहे.

युद्धाबाबत मध्य पूर्वेतून अत्यंत मोठी बातमी; इस्त्रायल, अमेरिकेची झोप उडाली, युद्ध आणखी 2 वर्ष सुरूच राहणार?
अमेरिका, इस्त्रायलला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 4:06 PM
Share

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता जवळपास एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या महिनाभरात युद्धामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक टॉप कमांडर मारले गेले आहेत. मात्र तरी देखील इराणने या युद्धातून माघार घेतलेली नाहीये, इराणचे इस्त्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले सुरूच आहेत. अमेरिका या युद्धात पूर्णपणे अडकल्याची दिसून येत आहे, दरम्यान या महिनाभराच्या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनदा युद्धविरामाचा देखील प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाहीये. आता एक बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे अमेरिका आणि इस्त्रायलला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणचे अनेक मिसाईल नष्ट केले, मात्र मिडिया रिपोर्टनुसार इराणकडून आता आपल्या नव्या मिसाईल बेसचे अनेक छायाचित्र जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक मिसाईल बेस असा आहे, जो खोलवर जमिनीमध्ये असून, डोंगररांगांमध्ये आहे. हा इराणचा सर्वात मोठा मिसाईल बेस असल्याचं मानलं जातं आहे. अमेरिकेनं इराणच्या अनेक मिसाईल बेसवर प्रचंड हल्ले केले आहेत, मात्र तरी देखील अमेरिका आणि इस्त्रायलला आतापर्यंत इराणचे अवघे 25 टक्केच मिसाईल बेस नष्ट करण्यात यश मिळालं आहे. मात्र या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे.

या संदर्भात इराणकडून आता हदरवणारा दावा करण्यात आला आहे. युद्ध सुरू होऊन एक महिना झाला आहे, मात्र आम्ही या युद्धात आतापर्यंत केवळ आमच्या एकूण मिसाई साठ्यांपैकी 30 टक्केच मिसाईल वापरल्या आहेत, आमच्याकडे 70 टक्के मिसाईल या सुरक्षित आहेत. इराणच्या या दाव्यानं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली आहे. जर युद्ध पुढील दोन वर्ष चाललं तरी देखील आम्हाला काही फरक पडणार नाही असा दावाही इराणने केला आहे. दरम्यान युद्ध सुरू होऊन फक्त 30 दिवसच झाले आहेत, तर संपूर्ण जगात इंधन टंचाईमुळे हाहाकार उडाला आहे, हे युद्ध जर आणखी काही दिवस चाललं तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, त्यामुळे जगाची देखील चिंता वाढली आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर