AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील महत्त्वाच्या व्यक्तीवर आत्मघातकी हल्ल्याचा कट! रशियातून अतिरेक्याला अटक, तपासात खळबळनजक माहिती

भारतावरचा मोठा आत्मघातकी हल्ला टळला आहे. देशातील एका महत्वाच्या व्यक्तीवरच्या हल्ल्याचा पर्दाफाश झालाय.

भारतातील महत्त्वाच्या व्यक्तीवर आत्मघातकी हल्ल्याचा कट! रशियातून अतिरेक्याला अटक, तपासात खळबळनजक माहिती
| Updated on: Aug 23, 2022 | 6:18 AM
Share

मुंबई : देशावरचं एक मोठं संकट टळलं आहे.  भारतावरचा मोठा आत्मघातकी हल्ला (Attack on India) टळला आहे. देशातील एका महत्वाच्या व्यक्तीवरच्या हल्ल्याचा (Terrorist Attack) पर्दाफाश झालाय. रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं त्याने ही कबुली दिली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्याच घेतला. त्याने ही कबुली दिली आहे. भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार होता. यात एका रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला. त्याने ही कबुली दिली आहे. काही दिवसांआधी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयित बोट आढळली होती. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर आता ही आलेली बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

हरिहरेश्वरला संशयित बोट आढळली!

हरिहरेश्वरमध्ये काही दिवसांआधी एक संशयित बोट आढळली होती. यात AK 47 बंदुका आणि काही काडतूसं आढळून आली होती. एकूण तीन बंदुकांनी भरलेली बोट समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालेली. रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सकाळी आढळून आली होती. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी पाहणी केला. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने अवघा देश हादरला होता. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आणि आता तर खुद्द दहशतवाद्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.

धमकीचा फोन

मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबईला उडवण्याची तयारी सुरू आहे 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याकरिता काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधू मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.