AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना मोठा झटका, तब्बल 37 खासदार…

काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती, या निवडणुकीत थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला मोठा यश मिळालं होतं. मात्र आता राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.

Thalapathy Vijay : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना मोठा झटका, तब्बल 37 खासदार...
vijay thalapathyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 08, 2026 | 4:49 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथा-पालथ पहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये टीव्हीके सारख्या नव्या पक्षानं एडीएएमके आणि डिएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना पराभवाची धूळ चारत मोठं यश मिळवलं. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वाधिक 107 जागा मिळाल्या मात्र तरी देखील हा पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दूर होता. अखेर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर काही छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. परंतु आता तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी डिलिमिटेशन बिलावर चर्चा करण्यासाठी राज्यातल्या सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीवर विरोधी पक्ष असलेल्या डीएमके आणि एआयएडीएमके सह इतर काही पक्षांनी बहिष्कार टाकल्याचं पहायला मिळालं.

तामिळनाडूमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन्ही मिळून एकूण खासदारांची संख्या 57 आहे, त्यापैकी 39 खासदार हे लोकसभेचे आहेत तर उर्वरीत 18 खासदार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. दरम्यान डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी आज सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 37 खासदारांनी दांडी मारली आहे, हा विजय थलपती यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या बैठकीमध्ये केवळ 20 खासदारच सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचे बारा, व्हिसीकेचे दोन, सीपीआयचे दोन, एमडीएमकेचे दोन आणि अन्य एक अशा वीस खासदारांचा समावेश आहे.

दरम्यान थलपती विजय यांनी बोलावलेल्या या बैठकीवर डीएमके पक्षाने जोरदार टीका केली आहे, ही बैठक म्हणजे लक्ष भरकटवण्यासाठी घातलेला घाट आहे. ही बैठक अनावश्यक आहे. त्याची काहीही गरज नसल्याचं डीएमकेनं म्हटलं आहे. कावेरी नदीच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष इतर विषयांकडे वळवण्यासाठी ही बैठक बोलावली होती, असाही आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. या बैठकीला केवळ 20 खासदारचं उपस्थित राहणार आहेत. या बिलाला देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षाकडून विरोध होताना दिसत आहे.

Follow Us
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार