AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा अमेरिकेला 440 व्होल्टचा धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

अमेरिकेसोबत भारतानं मोठी ट्रेड डील केली आहे, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय देखील घेतला, मात्र त्यानंतर आता भारतानं अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

भारताचा अमेरिकेला 440 व्होल्टचा धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 8:43 PM
Share

भारतानं गेल्या काही महिन्यांमध्ये काही मोठ्या ट्रेड डील केल्या आहेत. ज्यामध्ये युरोपियन यूनियन सोबत केलेल्या ट्रेड डीलचा देखील समावेश आहे. ही अत्यंत मोठी ट्रेड डील असून, या डीलला मदर ऑफ ऑल डील असं म्हटलं गेलं आहे. या ट्रेड डीलमध्ये 27 देशांचा समावेश आहे. या एफटीएमुळे भारताला युरोपियन राष्ट्रांच्या बाजारपेठा व्यापारासाठी खुल्या झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात निर्यात देखील वाढणार आहेत. युरोपियन संघानं या ट्रेड डीलनंतर भारतामधील अनेक वस्तुंवर शून्य टॅरिफ केला आहे. दरम्यान युरोपियन युनियनसोबत ट्रेड डील झाल्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत देखील मोठी ट्रेड डील केली आहे, ही ट्रेड डील झाल्यानंतर अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली होती, त्यांनी भारतावरील टॅरिफ कमी केला, पूर्वी भारतावर 50 टक्के टॅरिफ होता, तो आता 18 टक्के एवढा करण्यात आला आहे.

दरम्यान भारतानं रशियाकडून अतिरिक्त कच्च्या तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे, अमेरिकेनं याबाबत अनेकदा मोठा दावा देखील केला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची अतिरिक्त खरेदी करणार नाही, असं आश्वासन दिल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. मात्र भारतानं अमेरिकेला यावर चांगलंच सुनावलं आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी लागणारा खर्च, ऊर्जेची गरज आणि इतर सर्व गोष्टी बघून कच्च तेल कोणाकडून खरेदी करायचं याचा निर्णय आम्ही घेऊ असं भारतानं म्हटलं आहे.

दुसरीकडे भारतानं आता अमेरिकेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ते म्हणजे भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा असतानाच भारतानं मोठा निर्णय घेतला आहे, फक्त कच्च तेलच नाही तर आता भारत रशियासोबत एक मोठी ट्रेड डील करणार आहे. रशियाचे उपपंतप्रधान एलेक्सी ओवरचुंक यांनी यासंदर्भात बोलताना मोठा खुलासा केला आहे. या ट्रेड डील संदर्भातील पहिला चर्चेचा राउंड पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या ट्रेड डीलवर बोलताना रशियाचे उपपंतप्रधान सकारात्मक दिसून आले, त्यामुळे आता लवकरच भारत आणि रशियामध्ये एक मोठी व्यापारी ट्रेड डील होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना ओवरचुंक यांनी म्हटलं की भारतासोबत आम्ही व्यापारी ट्रेड डीलसंदर्भात बोलत आहोत. लवकरच ही ट्रेड डील होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या ट्रेड डीलमुळे मोठा फायदा होईल, जर ही ट्रेड डील झाली तर रशिया आणि भारतामधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी भारत आणि रशियामधील व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टावर जोर देण्यात आला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...