AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक Video !  ही विकृती पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, एवढी हिंमत येतेच कुठून? 

Bihar Kissing News | बिहारमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय परिसरात फोनवर बोलत उभ्या असलेल्या महिलेसोबत एका तरुणाने अत्यंत घृणास्पद कृत्य केलंय.

धक्कादायक Video !  ही विकृती पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, एवढी हिंमत येतेच कुठून? 
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 13, 2023 | 3:37 PM
Share

नवी दिल्ली | राज्यातीलच नव्हे तर देशातील महिला  सुरक्षित (Woman Security) नाहीत, याचे अनेक दाखले वारंवार उघडकीस येत आहेत. बिहार (Bihar) तर गुन्हेगारी आणि अशा घटनांसाठी सदैव कलंकित आहे. याच बिहारमधून एक अत्यंत संपातदायक प्रकार समोर आला आहे. येथील एका रुग्णालयाच्या परिसरात एक महिला फोनवर बोलत होती. इतक्यात एक नराधम तिच्या मागून आला आणि त्या महिलेसोबत अश्लील कृत्य सुरु केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यावर असंख्य संतापदायक प्रतिक्रिया उमटत आहेत. एकटी महिला पाहून इतके घाणेरडे कृत्य करण्याची ही हिंमत येतेच कुठून, असा उद्विग्न सवाल विचारला जातोय.

कुठे घडला नेमका प्रकार?

माध्यमांतील वृत्तानुसार, हा प्रकार 10 मार्च रोजी शुक्रवारी घडला, असं सांगण्यात येतंय. सदर महिला बिहारच्या जमुई सदर रुग्णालयात आरोग्य कर्मचारी म्हणून 2015 पासून कार्यरत आहे. मात्र तिच्याबाबत कधीही असा प्रकार घडला नव्हता. शुक्रवारी 10 मार्च रोजी सदर महिला रुग्णालय परिसरात फोनवर बोलत होती. एवढ्यात रुग्णालयाची भिंत ओलांडून एक तरुण धावतच तिच्यामागून येतो. तिचे तोंड दाबून अश्लीस कृत्य करतो आणि काही क्षणात पळून जातो. ही महिला प्रतिकार म्हणून काही करण्याच्या आतच तरुण तिथून निघून जातो.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर महिलेने जमुई येथील टाउन ठाण्यात घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमालाला तत्काळ पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजवरून बिहार पोलिसांनी आरोपी तरुणाच्या शोधासाठी तपास पथके पाठवली आहेत. या तरुणाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

रुग्णालय प्रशासन थंड?

सदर रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होतोय. रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षक असतानाही इतके घृणास्पद कृत्य घडतेच कसे? असा सवाल विचारला जातोय. तसेच ही घटना घडल्यानंतर 24 तास उलटूनही रुग्णालय प्रशासनाकडून काहीच कारवाई झालेली नाही. रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतींची उंची कमी असल्याची तक्रार याआधीही करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तरीही व्यवस्थापनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असं म्हटलं जातंय. बिहार पोलिसांनीही या प्रकरणात अद्याप कुणाला ताब्यात घेतलेलं नाही, यावरूनही सोशल मीडियातून तीव्र टीका होत आहे.

तो सिरियल किसर?

दरम्यान, काही स्थानिक माध्यमांच्या मते, सदर व्यक्ती सिरियल किसर आहे. शहरातील महिला व मुलींनी खबरदार राहण्याचे आवाहन या माध्यमांतून करण्यात येत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.