AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूग डाळ सोबत बनवा क्रिस्पी बटाटा वडा, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत बटाटा वडा खायचा विचार करत असाल तर यावेळी ही रेसिपी ट्राय करा. नेहमीच्या बेसन ऐवजी मूग डाळ सोबत बनवा. पाहा सोपी रेसिपी

मूग डाळ सोबत बनवा क्रिस्पी बटाटा वडा, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी
Make crispy potato vada with moong dal.Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 02, 2026 | 4:03 PM
Share

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम बटाटा वडा खायला कुणाला आवडणार नाही? चहासोबत क्रिस्पी वडा आणि तिखट-गोड चटणीची जोडी अनेकांची आवडती आहे. नेहमी बेसनाच्या आवरणात तयार केला जाणारा बटाटा वडा यावेळी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहा. बेसन किंवा चणा डाळ न वापरता मूग डाळीच्या मिश्रणात बटाट्याचे गोळे घोळवून हा वडा तयार करता येतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला हा वडा चवीला खमंग लागतो. घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही रेसिपी तयार करता येत असल्याने नाश्त्यासाठी हा एक सोपा पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, तळण्याऐवजी अप्पे पात्राचा वापर करून कमी तेलातही ही रेसिपी करता येते. त्यामुळे नेहमीच्या बटाटा वड्याला थोडा वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल, तर मूग डाळीचा हा वडा नक्की ट्राय करा.

साहित्य

• १ कप मूग डाळ • ४ ते ५ उकडलेले बटाटे • २ हिरव्या मिरच्या • ४ ते ५ लसूण पाकळ्या • १ छोटा तुकडा आलं • १ चमचा मोहरी • अर्धा चमचा जिरे • चिमूटभर हिंग • अर्धा चमचा हळद • २ चमचे तांदळाचं पीठ • कोथिंबीर • कढीपत्ता • चवीनुसार मीठ • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन काही तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ चांगली भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून ती मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्या. मिश्रण खूप पातळ होणार नाही, याची काळजी घ्या. यानंतर उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे यांची जाडसर पेस्ट तयार करा. कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर तयार केलेली पेस्ट घालून परता. त्यात हळद, मीठ आणि मॅश केलेले बटाटे घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

बटाट्याचं मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे तयार करा. दुसरीकडे वाटलेल्या मूग डाळीत तांदळाचं पीठ, थोडी हळद आणि मीठ घालून घट्टसर मिश्रण तयार करा. तयार बटाट्याचे गोळे या मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या. कढईत तेल गरम करून हे गोळे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. कमी तेलात वडा खायचा असेल तर अप्पे पात्राचाही वापर करू शकता. अप्पे पात्राला थोडं तेल लावून त्यात मूग डाळीच्या मिश्रणात बुडवलेले गोळे ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तयार झालेले गरमागरम वडे हिरवी चटणी किंवा गोड-तिखट चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा.

Follow Us
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम