AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Liquor Deaths: बनावट दारू प्यायल्याने मृत्यूतांचा आकडा 42 वर; 19 दारू विक्रेत्यांना अटक, 2 अधिकारी निलंबित

गेल्या 2 दिवसांत बिहारच्या गोपालगंज आणि पश्चिम चंपारणमध्ये 24 जणांचा बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 19 दारू विक्रेत्यांना अटक केली आणि इतर सहा जणांचे घरं सील केली आहेत.

Bihar Liquor Deaths: बनावट दारू प्यायल्याने मृत्यूतांचा आकडा 42 वर; 19 दारू विक्रेत्यांना अटक, 2 अधिकारी निलंबित
Representation image
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 12:37 AM
Share

पाटनाः बिहारमध्ये बेकायदेशीर दारू पिण्याने मृत्यांचा आकडा वाढतच चाललाय. शनिवारी ही संख्या 42 वर पोहोचली. ज्यात गेल्या 2 दिवसांत बिहारच्या गोपालगंज आणि पश्चिम चंपारणमध्ये 24 जणांचा बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 19 दारू विक्रेत्यांना अटक केली आणि इतर सहा जणांचे घरं सील केली आहेत. (Bihar police arrests 9 suppliers 2 officers suspended in  illegal alchohol consumption 42 people dead incidents)

समस्तीपूर जिल्ह्यात दारूमुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि पटोरी ब्लॉकच्या रुपौली गावातील आणखी सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जिल्हा एसपी एमएस ढिल्लन यांनी शनिवारी सांगितले. “रुपौली येथील रवींद्र राय यांच्या घरातून ब्रँडेड मॅकडॉवेलची बाटली देखील सापडली आहे, जो भारतीय सैन्यातील कर्मचारी होता आणि दिवाळीच्या सुट्टीवर आला होता,” असे एसपी ढिल्लन यांनी सांगितले. रवींद्रचे वडील महेश्वर राय यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या मुलाने दिवाळीच्या रात्री पार्टी ठेवली होते आणि “विदेशी” दारू दिली होती. एसपी म्हणाले की, एका बीएसएफ अधिकाऱ्याने दुसरी पार्टी आयोजित केली होती जिथे चार जणांचा मृत्यू झाला.

दारूबंदी असतानाही हा मृत्यूतांडव

सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कारण देत बिहार सरकारने दारूविक्रीवर बंदी घातली आहे. असं असताना बिहारमध्ये विषारी व अवैध दारूमुळे लोकांचे मृत्यू होतायेत म्हणून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जातायेत. बिहार सरकार दारूच्या अवैध धंद्यावर लगाम लावण्त अयश्स्वि ठरली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि बनावट दारूच्या घटनांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच दोषी अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या नंतर आज निष्काळजीपणाच्या आरोपावरून राज्य सरकारने नौतन आणि लॉरिया पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित केले.

Other News

Tripura Voilence: 102 Twitter Accounts विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस म्हणतात एकाही मशिदीला आग लागली नाही

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या 12 लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज, सरकारने केली तयारीला सुरूवात

संतापजनक ! थकीत पैसे मागायला जाताच माजी मंत्री भडकले, शेतकऱ्याला थेट शिवी हासडली

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.