CCTV Video : चेकपोस्टवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलीसांनी थांबवलं तर थांबाच!

कर्मचाऱ्यानं हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण उलट दुचाकीस्वारांनी चेकिंग टाळण्यासाठी बाईकचा वेग आणखी वाढवला आणि घात झाला (Bike Rider check post Telangana)

CCTV Video : चेकपोस्टवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलीसांनी थांबवलं तर थांबाच!
बाईकस्वार चेकपोस्टच्या बॅरीकेडवर धडकला
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 8:08 AM

हैदराबाद : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला आहे. याला अपघात तरी कसं म्हणावं? कारण पोलीसांची चेकिंग टाळण्यासाठी दोन बाईकस्वारांनी गाडीचा वेग वाढवला आणि त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून जीवाचा थरकाप उडवणारी आहे. आपण कमकुवत ह्रदयाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नये हा सल्ला. (Bike Pillion Rider hit the Thapalpur check post barricade caught in cctv footage in Mancherial district in Telangana)

नेमकं काय घडलं?

मंचेरियल जिल्ह्यातल्या तपालपूर गावात वनविभागाचा चेक पोस्ट आहे. ह्या चेकपोस्टला जन्नाराम भागातला चेकपोस्ट म्हणूनही ओळखतात. सीसीटीव्ही फुटेजनुसार, 22 मे रोजी वन विभागाचे कर्मचारी चेकपोस्टवर गस्त घालत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तपासणीसाठी बॅरीकेडसही लावलेले होते. एक कर्मचारी बॅरीकेडवर उभा आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघे जण दुचाकीवर वेगात आले. कर्मचाऱ्यानं त्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्नही केला पण उलट दुचाकीस्वारांनी चेकिंग टाळण्यासाठी बाईकचा वेग आणखी वाढवला.

बॅरीकेड पूर्ण वर जाईपर्यंत उशीर झाला

बाईकस्वारानं वाढवलेला वेग पहाता, कर्मचाऱ्यानं बॅरीकेड हटवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला. बाईक चालवणाऱ्यानं मान बॅरीकेडच्या खाली वाकवून गाडीची स्पीड आणखी वाढवली, त्यात तो सुटला पण त्याच्या पाठीमागे बसलेला मात्र जीवानीशी गेला. त्याची मान वेगानं बॅरीकेडवर आदळली आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

कोरोना काळातले बॅरीकेडस कोरोनामुळे ठिकठिकाणी चेकिंगसाठी बॅरीकेडस आणि चेकिंग पोस्ट उभारण्यात आलेत. वाहनांच्या तपासणी हे चेकपोस्ट आहेत. पण काही जण जीव धोक्यात घालून तो चेकपोस्ट चुकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतायत. त्यातून अपघात वाढतायत. ते टाळायचं असेल तर नियमांचं पालन करणं हाच एकमेव उपाय आहे. (Bike Rider check post Telangana)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं

VIDEO | पाळीव सिंहाचा चिमुकल्यावर हल्ला, थरारक CCTV व्हिडीओ, मालकावर गुन्हा

(Bike Pillion Rider hit the Thapalpur check post barricade caught in cctv footage in Mancherial district in Telangana)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.