भाजपाने सोनिया गांधींचं 45 वर्षे जुनं प्रकरण काढलं बाहेर, सर्वकाही समोर मांडलं

मतदार याद्यांचं प्रकरण गेल्या काही दिवसात चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधकांना निवडणूक आयोगावर निशाणा साधताना सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केलं आहे. असं असताना भाजपाने 45 वर्षे जुनं प्रकरण आता बाहेर काढलं आहे.

भाजपाने सोनिया गांधींचं 45 वर्षे जुनं प्रकरण काढलं बाहेर, सर्वकाही समोर मांडलं
भाजपाने सोनिया गांधींचं 45 वर्षे जुनं प्रकरण काढलं बाहेर, सर्वकाही समोर मांडलं
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 13, 2025 | 4:56 PM

निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांची यादीच समोर मांडली. त्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तसेच सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी वाकयुद्ध सुरु झालं आहे. असं असातना बुधवारी भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने आरोप केला की, सोनिया गांधी यांना भारताचं नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचं नाव 45 वर्षापूर्वी बेकायदेशीरित्या मतदार यादीत समाविष्ट केलं होते. यामुळे आता राजकारण तापलं आहे. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दावा केला की, सोनिया गांधी यांचा जन्म 1946 मध्ये इटलीत झाला. त्यांचं नावा 1980 ते 1982 पर्यंत मतदार यादीत होते. त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या एक वर्षे आधीच त्यांच्या नावाची नोंद होती.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर ट्वीट करत एक पुरावा जोडला आहे. त्यांनी 1980 मतदार उताऱ्याची प्रत पोस्ट केली आहे. त्यांचा आरोप आहे की, सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीत होते. तेव्हा त्यांना भारताचं नागरिकत्वही मिळालं नव्हतं. त्यांनी कायद्याचं स्पष्ट उल्लंघन केलं आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. मालवीय यांच्या दाव्यानुसार, सोनिया गांधी यांनी 1968 साली राजीव गांधी यांच्याशी लग्न केलं. तेव्हा गांधी कुटुंब तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी राहात होते.

मालवीय यांनी पुढे सांगितलं की, 1980 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नवी दिल्ली लोकसभा क्षेत्रातील मतदार यादीत त्यांचं नाव समाविष्ट केलं गेलं. तेव्हा त्या इटलीच्या नागरिक होत्या. त्यानंतर बराच वाद झाला आणि त्यांचं नाव 1982 मध्ये मतदार यादीतून काढण्यात आलं. 1983 मध्ये भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पुन्हा त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादीत करण्यात आला. मालवीय यांच्या दाव्यानुसार, कट ऑफ तारीख 1 जानेवारी होती. पण सोनिया गांधींना एप्रिलमध्ये नागरिकत्व मिळाले.