AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेतून भारतीयांची पळापळ! हद्दपारीची भीती की आणखी काही? जाणून घ्या कारण

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हुकूमशाह पद्धतीने वागत असल्याचं दिसत आहे. भारतावर टॅरिफ लादल्यानंतर आता तणाव वाढला. असं असताना अमेरिकेतून भारतीयांनी पळ काढण्यास सुरुवात केली आहे. का आणि कशासाठी ते जाणून घ्या

टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेतून भारतीयांची पळापळ! हद्दपारीची भीती की आणखी काही? जाणून घ्या कारण
टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेतून भारतीयांची पळापळ! हद्दपारीची भीती की आणखी काही? जाणून घ्या कारणImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 13, 2025 | 3:54 PM
Share

अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तिथे राहणाऱ्या इतर देशातील लोकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेक समस्या समोर उभ्या असल्याने जगणं कठीण झालं आहे. पहिलं तर व्हिसाचे नियम कठोर करण्यात आले. त्यामुळे अडचणीत वाढ झाली. आता तिथे राहणाऱ्या भारतीयांना हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर अमेरिका सोडण्यास सांगितलं आहे. नियमानुसार त्यांच्याकडे 60 दिवसांचा वेळ होता. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या एच 1बी व्हिसाधारक किवंच्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला नोकरी गमावल्यानंतर 60 दिवसात मुदतीपूर्वीच हद्दपारीची नोटीस मिळाली आहे. यामुळे त्यांना भारतात परतण्याशिवाय पर्याय नाही. अमेरिकेच्या या धोरणामुळे तिथे राहणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. कारण तिथे राहणाऱ्या लोकांच्या हाती नोकरी नसल्याने पैसे नाहीत. त्यात महागड्या जीवनशैलीमुळे तिथे राहणं कठीण झालं आहे.

अनेक भारतीय एच1बी व्हिसावर अमेरिकेत काम आहेत. अनेकांनी तिथेच स्थायिक होण्याची योजनाही आखली आहे. पण आता तिथली स्थिती बदलली आहे. अमेरिकेत नोकरीवरून काढल्यानंतर एच 1 बी कामगारांना नवं काम शोधण्यासाठी किंवा व्हिसाची स्थिती बदलण्यासाठी 60 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. पण 2025 या वर्षाच्या जून महिन्यापासूनच वाढीव कालावधी संपण्यापूर्वीच नोटीसा दिल्या जात आहेत. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एनटीए दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत पाठवले गेले आहेत. नियमानुसार 60 दिवसांचा वाढील कालावधी अनिवार्य असला तरी हा कालावधी वाढण्याचं अधिकाऱ्यांच्या हातात आहे.

एका सर्व्हेक्षणानुसार, अनेक लोकं भारतात परत येऊ इच्छित आहेत. कारण तिथे राहणाऱ्या 45 टक्के लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 26 टक्के लोकं नोकरीसाठी इतर देशात गेलेत. तर उर्वरित लोकं भारतात परण्याचा विचार करत आहेत. कारण मुदत संपण्याआधीच नोटीसा येत असल्याने भविष्यात अडचणी वाढू शकतात. अनेकांना अमेरिका सोडण्याची भीती वाटत आहे. कारण इतका पगार पुन्हा मिळणं कठीण आहे. त्यामुळे जीवनशैलीवरही परिणाम होणार आहे. दुसरीकडे, टॅरिफ वॉरमुळे भारतासोबतचे संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत भारतीयांवर आणखी कठोर कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.