मध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर इमरती देवींची टीका, तर भाजपकडून मौन धारण करुन निषेध

डबरा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणाऱ्या भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केलीय. तर दुसरीकडे कमलनाथ यांच्या निषेधार्थ भाजपतर्फे मौन धारण करुन राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. (BJP candidate Imrati Devi criticizes Kamal Nath on controversial statement)

मध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या 'त्या' वक्तव्यावर इमरती देवींची टीका, तर भाजपकडून मौन धारण करुन निषेध
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 8:44 AM

भोपाळ : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह शेरेबाजीनंतर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे कमलनाथ यांच्या शेरेबाजीवर बोलताना डबरा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणाऱ्या भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांनी सडकून टीका केलीय. तर दुसरीकडे कमलनाथ यांच्या निषेधार्थ आज भाजपतर्फे मौन धारण करुन राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. (BJP candidate Imrati Devi criticizes Kamal Nath)

इमरती देवी म्हणाल्या “मी एका दलित समुदायातून येते. दलितांच्या घरी जन्माला येणं चुकीचं आहे का ? माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून गरिबांच्या घरात जन्माला येणं चुकीचं आहे का?” तसेच, महिलांविषयी असभ्य भाषेत बोलणाऱ्यांना पक्षात ठेवू नये असे म्हणत, त्यांनी कमलनाथ यांची हकालपट्टी करण्याचे आवाहन केले आहे. महिलांवर जर अशा भाषेत बोलले जात असेल तर त्या समोर कशा जातील त्यांची प्रगती कशी होईल? असा सवालही त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केला आहे. इमरती देवी भाजपडून डबरा मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्या जोतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

दुसरीकडे इमरती देवी यांच्या सन्मानार्थ भाजपडून मौन धारण करुन कमलनाथ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण भोपाळमध्ये सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मौन धारण करतील. तसेच संपूर्ण मध्य प्रदेशात भाजपकडून 10 ते 12 वाजेपर्यंत मौन धारण करुन कमलनाथ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

कमलनाथ काय म्हणाले होते?

मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं काय नाव घेऊ, तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगलं ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं, ‘काय आयटम आहे’.”

‘आयटम शब्दप्रयोग करुन कमलनाथ यांचे सामंतवादी विचार उघड’

कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह शेरेबाजीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कमलनाथजी इमरती देवी या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं नाव आहे जिने मोलमजुरी करुन सुरुवात केली. आज त्या राष्ट्रउभारणीच्या कामात आपलं योगदान देत आहेत. काँग्रेसने मला ‘भुकेला-नग्न’ म्हटलं आणि आता एका महिलेसाठी ‘आयटम’ शब्दप्रयोग करुन त्यांचे सामंतवादी विचार उघड झाले आहेत.”

संबंधित बातम्या : ‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

MP congress crisis | राहुल गांधींचा हुकमी एक्का मोदींच्या भेटीला, मध्य प्रदेशात काँग्रेस संकटात

(BJP candidate Imrati Devi criticizes Kamal Nath)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.