डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला भाजपचे चोख प्रत्युत्तर, घेतला मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपने 'स्वदेशी जागरण अभियान' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला भाजपचे चोख प्रत्युत्तर, घेतला मोठा निर्णय
Trump And bjp
| Updated on: Aug 23, 2025 | 7:16 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपने ‘स्वदेशी जागरण अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आता ‘लोकल फॉर व्होकल’ मोहिमेसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने शुल्क वाढवल्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशांतर्गत उद्योगबाबत जनजागृती करणार आहे.

याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली 19 आणि 20 ऑगस्ट रोजी आरएसएसची एक बैठक झाली होती. या बैठकीत स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप अध्यक्षांनी सरचिटणीसांची बैठक घेत ‘व्होकल फॉर लोकल’ मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत रणनीतीही तयार करण्यात आली आहे.

व्होकल फॉर लोकल मोहीम

भाजप संघटन सरचिटणीस बीएल संतोष आणि सरचिटणीस अरुण सिंह यांनी संघाच्या बैठकीत भाग घेतला होता. यावेळी संघाने संलग्न संघटनांना शेतकऱ्यांच्या उत्पादनांना लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. मध्यम उद्योगांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली आहे.

याआधी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्वावलंबनावर भर दिला होता. त्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना भारताला स्वावलंबी, विकसित आणि समृद्ध देश बनवण्यासाठी स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

देशाला स्वावलंबी बनवण्यावर लक्ष

जेपी नड्डा म्हणाले होते की, ‘पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात देशातील 140 कोटी लोकांना प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले आहे यासाठी आता आपल्याला योगदान द्यायचे आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कानंतर देशात आता स्वावलंबनाची मोहीम सुरु होताना दिसत आहे. त्यामुळे आता स्वदेशीचा वापर वाढणार आहे. यामुळे देशातील माल देशातच विकला जाणार आहे. यामुळे निर्यात कमी होईल आणि त्यावर अमेरिकेने लादलेल्या कराचा फटकाही देशाला कमी प्रमाणात बसेल.