AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातून मोठी बातमी! भाजपने 3 माजी खासदार फोडले; थेट पक्षप्रवेशाने देशात खळबळ

Trinamool Congress : पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

राजकारणातून मोठी बातमी! भाजपने 3 माजी खासदार फोडले; थेट पक्षप्रवेशाने देशात खळबळ
tmc 3 former mp join bjpImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2026 | 7:50 PM
Share

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. अशातच आता टीएमसीचे माजी राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय, प्रकाश चिक बडाईक आणि सुष्मिता देव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी या पक्ष प्रवेशाबाबत सांगितले की, या तिन्ही खासदारांनी यापूर्वीच टीएमसीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भय आउट, भरोसा इन या घोषवाक्यासह भाजपने निवडणूक लढवली आणि जनतेने त्याला पाठिंबा दिला. या राज्यसभा खासदारांची संसदीय कामगिरी चांगली होती आणि हे सर्वांनाच माहीत आहे. पंतप्रधानांनी देशवासीयांसमोर पश्चिम बंगालला विकासाच्या मार्गावर एकत्र नेण्याचा संकल्प व्यक्त केला असून, त्याच उद्देशाने या खासदारांनी भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिला होता राजीनामा

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या तिन्ही खासदारांनी टीएमसीचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता या तिघांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बंगालला वाळवंट बनवले – सुखेंदू शेखर रॉय

भाजपमध्ये प्रवेश करताना माजी खासदार सुखेंदू शेखर रॉय म्हणाले की, मागील सरकारने पश्चिम बंगालला विकासापासून दूर ठेवले. एकेकाळी देशाला दिशा देणारा बंगाल घोटाळ्यांनी ग्रासला होता. या परिस्थितीत राज्यातील जनतेने भाजपला संधी देण्याचा निर्णय घेतला. टीएमसीतील अनेक लोक राजकारणाशी बांधिलकी असलेले नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांत आरजी कर प्रकरणाच्या विरोधात राज्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. इतर राज्ये विकासासाठी केंद्र सरकारकडे जातात, मात्र बंगालमधील सरकारचे एकमेव उद्दिष्ट केंद्र सरकारला विरोध करणे हेच होते. त्यामुळे रोजगाराच्या शोधात तरुण मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर जात असून, बंगाल वृद्धाश्रमासारखा बनला आहे.

टीएमसीमध्ये तळागाळापर्यंत भ्रष्टाचार – सुष्मिता देव

सुष्मिता देव म्हणाल्या की, आसाममध्ये ज्या प्रकारे मूलभूत सुविधा विकसित झाल्या आहेत, त्या अभूतपूर्व आहेत. मी टीएमसीमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा उद्देश होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे करिष्माई नेतृत्व इतर कोणाकडेही नाही. मी दीदींना साधी सूती साडी आणि हवाई चप्पल घातलेल्या पाहिल्या होत्या. पण नंतर पक्षात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळाला, तो कल्पनेपलीकडचा होता. तळागाळापर्यंत भ्रष्टाचार पसरलेला आहे.’

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे