ऐका हो ऐका..मुलगी जन्मली तर 50 हजार रुपये, पदवीपर्यंत शिक्षण मोफत, वर्षातून 2 सिलिंडरही फ्री, भाजपची घोषणा चर्चेत!

उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना वर्षाला 2 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील, असे आश्वासनही भाजपने दिले आहे.

ऐका हो ऐका..मुलगी जन्मली तर 50 हजार रुपये, पदवीपर्यंत शिक्षण मोफत, वर्षातून 2 सिलिंडरही फ्री, भाजपची घोषणा चर्चेत!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 2:07 PM

नवी दिल्लीः ज्या दिवशी निवडणूकीचे निकाल लागतात, त्याच दिवसापासून पुढील निवडणुकांसाठी भाजपची रणनीती सुरु होते, असे दाखले नेहमी दिले जातात. देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपने दमदार रणनीती आखल्याचं चित्र आहे. देशाच्या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मेघालय (Meghalay), त्रिपुरा (Tripura) आणि नागालँड (Nagaland).  मेघालय राज्यातील विधावसभेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नुकतंच भाजपचा जाहीरनामा घोषित केला. यात ज्या घरात मुलगी जन्माला आली, त्या पालकांसाठी तसेच संबंधित मुलीच्या पालन-पोषणासाठी मोठी घोषणा केली आहे.

भाजपचा जाहीरनामा काय?

मेघालयात भाजपचा जाहीरनामा सादर करताना जे पी नड्डा म्हणाले, मला मेघालयासाठी जाहीरनामा सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. संस्कृती आणि परंपरांचा आम्हाला आदर आहे. यासाठीच आम्ही मेगा मेघालय ही महत्त्वाकांक्षा जोपासली आहे.

स्पीड, स्केल आणि स्कील या तीन पैलूंवर मेघालयचा विकास करण्याचा भाजपचा मानस आहे, अशी भूमिका जे पी नड्डा यांनी मांडली.

या जाहीरनाम्याद्वारे जनतेच्या हितासाठीच्या काही घोषणाही भाजपने जाहीर केल्या. त्यात मेघालयात ७ वा वेतन आयोग लागू करणारर, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे २,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत वाढवणार असं म्हटलंय.

मुलगी जन्मली तर…

भाजपचे सरकार आले तर मेघालयात मुलींसाठी खास योजना सुरु करणार असल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं. मुलगी जनेमली तर  50 हजार रुपयांचा बाँड केला जाईल. तसेच तिचे के जी ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

दोन गॅस सिलिंडर मोफत

तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना वर्षाला 2 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील, असे आश्वासनही भाजपने दिले आहे.

युवकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केले जातील. तसेच रोजगाराच्या संधीदेखील वाढवल्या जातील, असं आश्वासन भाजपतर्फे देण्यात आलंय.

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी महत्त्वाच्या पक्षांनी कंबर कसली आहे. मेघालयची विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी बरखास्त होणार आहे. तर येथे विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

मेघालयात कुणाचं सरकार?

६० विधानसभा सदस्य असलेल्या मेघालयमध्ये सध्या नॅशनल पिपल्स पार्टीचं सरकार आहे. तर त्रिपुरात भाजप आणि नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचं सरकार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये एनपीपी हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.