Video: भाजपच्या मंत्र्यांनी महिला उमेदवाराच्या केसांत हात घातला, काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर, पण खरं काहीतरी वेगळंच!

| Updated on: Oct 19, 2021 | 11:16 AM

मध्य प्रदेशातील भाजपचे एक मंत्री महिलेच्या केसांना हात लावल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्याचं झालं असं, की मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्याच्या रायगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान इथं आले होते, शिवराज सिंह चौहान यांचं भाषण सुरु असतानाचा हा प्रकार घडला,

Video: भाजपच्या मंत्र्यांनी महिला उमेदवाराच्या केसांत हात घातला, काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर, पण खरं काहीतरी वेगळंच!
महिला उमेदवारांच्या केसाला हात लावताना मंत्री बिजेंद्र प्रताप सिंह
Follow us on

भोपाळ: मध्य प्रदेशातील भाजपचे एक मंत्री महिलेच्या केसांना हात लावल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्याचं झालं असं, की मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्याच्या रायगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान इथं आले होते, शिवराज सिंह चौहान यांचं भाषण सुरु असतानाचा हा प्रकार घडला, जो कॅमेऱ्यात कैद झाला. (BJP minister from Madhya Pradesh Bijendra Pratap Singh touched the hair of a woman candidate. Video share from Congress, reply from BJP)

सोशल मीडियावार व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, कथितरीत्या राज्याचे खणन मंत्री ब्रिजेंद्र प्रताप सिंह पहिल्यांदा खिशात चष्मा शोधताना दिसत आहेत, तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेला एक माणूस मंत्र्याच्या चष्मा भाजपच्या महिला उमेदवाराच्या केसात अडकल्याचे सांगतो. ही महिला उमेदवार शिवराज सिंह यांच्या बाजूला उभी आहे. यानंतर, त्या महिलेच्या मागे बसलेले मंत्री तिच्या केसातून चष्मा काढताना दिसतात. भाजपवर हल्ला चढवत काँग्रेसने आरोप केला की, मंत्र्याने एका महिला उमेदवाराला चुकीचा स्पर्श केला. काँग्रेसने यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

पाहा काँग्रेसने शेअर केलेला व्हिडीओ:

काँग्रेसची भाजपवर टीका

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंत्री शेजारी बसलेल्या भाजप पदाधिकाऱ्याशी बोलत आहेत. तेवढ्यात त्यांना केसांत चष्मा फसल्याचं हा पदाधिकारी सांगतो, आणि त्यानंतर शिवराजसिंह तो चष्मा या महिला उमेदवाराच्या केसातून काढतात. राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना जैस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘भाजप केवळ महिला सक्षमीकरण असल्याचे भासवते, पण व्हिडिओ आणि फोटोने वास्तव दाखवले आहे. खणन मंत्र्यांनी केवळ महिला उमेदवाराच्या केसांना स्पर्श केला नाही तर चुकीच्या पद्धतीने तिच्यावर हात ठेवला. ” कॅडरवर आधारित शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने मंत्र्याविरुद्ध कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. जयस्वाल म्हणाल्या की, अशा लोकांना मंत्र्यासारखे आदरणीय पद मिळू नये.

पाहा नक्की काय घडलं होतं!

भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर

दुसरीकडे, भाजपचे प्रदेश सचिव रजनीश अग्रवाल म्हणाले की, ही प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांचं गलिच्छ मन आणि विचार दर्शवते. “ही केवळ विकृत मानसिकता नाही तर दलित महिला उमेदवाराचा अपमान आहे. आणि हीच काँग्रेसची परंपरा आहे.

हेही वाचा:

Kerala Flood: डोळ्यासमोर अख्खं घर वाहून गेलं, देवभूमी केरळात वरुणराजाचा रुद्रावतार, भूस्खलनात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

RAIL ROKO Andolan Today: लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकरी आक्रमक, रेल्वे कुठं थांबवायची हे आम्हाला माहिती, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा