ओडिशा विधानसभेत ‘हायव्होल्टेज ड्रामा’, भाजप आमदाराकडून सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण काय?

| Updated on: Mar 13, 2021 | 12:30 AM

ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय.

ओडिशा विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा, भाजप आमदाराकडून सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण काय?
Follow us on

भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय. या घटनेनंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या या भाजप आमदाराचं नाव सुभाष चंद्र पाणिग्रही असं आहे. त्यांनी राज्यातील तांदुळ खरेदीच्या मुद्द्यावर आक्रमक होत हा टोकाचा निर्णय घेतला. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत तांदुळ खरदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा हा सर्व प्रकार घडला (BJP MLA Subhash Chandra Panigrahi suicide attempt in Odisha Assembly session).

भाजप आमदार सुभाष चंद्र यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकाऊन घेतलं. पाणिग्रही यांनी आरोप केलाय, “सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी तांदुळ खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिलाय. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष देत नाही.”

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

ओडिशा राज्य सरकारने आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत वारंवार उपस्थित करुनही सरकार शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष देत नाहीये. त्यामुळेच आपण सॅनिटायझर पिण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आमदार पाणिग्रही यांनी केलाय.

याआधी सकाळी भाजप आमदार पाणिग्रही यांनी सरकारला आत्महत्येचा इशाराही दिला होता. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात त्यांनी आंदोलनही केलं होतं. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचा तांदुळ खरेदी करा, अन्यथा आत्मदहन करेल, अशी धमकी दिली होती.

हेही वाचा :

ओडिशातील जंगलांमध्ये 10 दिवसांपासून धुमसती आग, 3000 प्रकारच्या वनस्‍पती धोक्यात

पाठवणी करताना नववधूला भावना अनावर, रडता-रडताच कार्डिअ‍ॅक अरेस्टने मृत्यू

Odisha Fake Notes | कारमध्ये 500 रुपयांचे 1580 बंडल, 7.90 कोटींचे बनावटी नोट, पोलिसांकडून तिघांना अटक

व्हिडीओ पाहा :

BJP MLA Subhash Chandra Panigrahi suicide attempt in Odisha Assembly session