AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odisha Fake Notes | कारमध्ये 500 रुपयांचे 1580 बंडल, 7.90 कोटींचे बनावटी नोट, पोलिसांकडून तिघांना अटक

ओदिशाच्या कोरापूट जिल्ह्यात सोमवारी ओदिशा-आंध्र प्रदेश बॉर्डरवर (Fake Notes Of 500 Rs Worth Of 7.90 Crore Found) पोलिसांना एका कारच्या तपासा दरम्यान तब्बल 7.90 कोटी रुपयांचे बनावटी नोट आढळून आले आहेत.

Odisha Fake Notes | कारमध्ये 500 रुपयांचे 1580 बंडल, 7.90 कोटींचे बनावटी नोट, पोलिसांकडून तिघांना अटक
Odisha police
| Updated on: Mar 03, 2021 | 7:40 AM
Share

भुवनेश्वर : ओदिशाच्या कोरापूट जिल्ह्यात सोमवारी ओदिशा-आंध्र प्रदेश बॉर्डरवर (Fake Notes Of 500 Rs Worth Of 7.90 Crore Found) पोलिसांना एका कारच्या तपासा दरम्यान तब्बल 7.90 कोटी रुपयांचे बनावटी नोट आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे (Odisha Fake Notes Of 500 Rs Worth Of 7.90 Crore Found In Car At Koraput Police Arrested 3 People ).

कोरापूट पोलीस अधीक्षक (एसपी) वरुण गुंटुपल्ली यांनी मंगळवारी कोरापूटमध्ये पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” सुनकी पोस्टवर नेहमीप्रमाणे गाड्यांची चेकिंग सुरु होती. यादरम्यान, गाड्यांच्या चेकिंग दरम्यान छत्तीसगडच्या नंबरची एक हॅचबॅक कारमधून चार ट्रॉली बॅग मिळाले. या बॅग्जच्या तसापादरम्यान बॅगमधून 500 रुपयांचे बनावटी नोट मिळाले.”

पोलीस अधीक्षक म्हणाले, चौकशीदरम्यान तिघांनीही हे कबुल केलं की त्यांना हे बनावटी नोट छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून कलर कॉपी बनवणाऱ्याकडून मिळाले आहेत. सोबतच त्यांनी सांगितलं की, ते या बनावटी नोटांना विशाखापट्टनममध्ये कोणाला द्यायला जात होते. या बनावटी नोटांमध्ये 500 रुपयांचे एकूण 1,580 बंडल होते आणि प्रत्येक बंडलमध्ये तब्बल 500 चे 100 नोट होते.

पोलिसांच्या मते या बनावटी नोटांची किंमत तब्बल 7.90 कोटी रुपये आहे. सोबतच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पाच मोबाईल फोन आणि 35,000 रुपयो रोकड जप्त केले आहेत. कोरापूट पोलीस अधीक्षक वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितलं, आम्ही या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

आरोपींनी रायपूर येथून प्रवास करत अनेक चेक नाके आणि पोलीस स्टेशन पार केले होते. ओदिशा बॉर्डरवर सुनकी ही शेवटची पोलीस चौकी होती. पोलिसांना संशय होता की ते भांग घेऊन जात आहेत. पण, तपासात त्यांच्याकडे बनावटी नोट आढळून आले. सध्या पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Odisha Fake Notes Of 500 Rs Worth Of 7.90 Crore Found In Car At Koraput Police Arrested 3 People

संबंधित बातम्या :

दारु विक्रेत्यांचा मोठा प्लान नागपूर पोलिसांकडून उद्ध्वस्त; ‘या’ कारणासाठी केला होता दारुसाठा

इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.