AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका; पश्चिम बंगालच्या निकालावर काय म्हटलंय..

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. या विजयावर न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि डॉन सारख्या जागतिक माध्यमांनी दिलेल्या विशेष प्रतिक्रिया आणि निवडणूक विश्लेषणाबद्दल सविस्तर वाचा.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत भाजपच्या विजयाचा डंका;  पश्चिम बंगालच्या निकालावर काय म्हटलंय..
Pm Modi
| Updated on: May 05, 2026 | 10:59 AM
Share

भारताच्या राजकीय नकाशावर एक मोठा बदल घडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे भाजपला प्रथमच बंगालमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम बंगालसोबतच आसाममध्ये भाजपने आपली सत्ता राखली असून, पुद्दुचेरीमध्ये एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होणार आहे.

बंगालमध्ये सत्तांतर १५ वर्षांच्या राजवटीचा अंत

राज्यातील पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतंच जाहीर झाले. या निवडणुकांचे सर्वात मोठे आकर्षण पश्चिम बंगाल होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेषतः ममता बॅनर्जींचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक प्रचारामुळे तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

जागतिक माध्यमांच्या नजरेतून मोदींचा विजय

या निकालांचे पडसाद केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्येही उमटले आहेत. पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतच्या वृत्तपत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची दखल घेतली आहे.

पाकिस्तान (डॉन वृत्तपत्र): पाकिस्तानच्या अग्रगण्य ‘डॉन’ वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या पश्चिम बंगालमध्ये विक्रमी विजय मिळवला आहे. हिंदू राष्ट्रवादी पक्षाने मिळवलेला हा विजय मोदींच्या राजकीय ताकदीची साक्ष देतो, असे डॉन या वृत्तपत्रात म्हटले आहे.

ब्रिटन (बीबीसी न्यूज): भाजपने भारतातील सर्वात कठीण राजकीय सीमांपैकी एक असलेल्या बंगालवर विजय मिळवला आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात वर्चस्व गाजवल्यानंतर आता भाजपने ईशान्य आणि पश्चिम बंगालसारख्या प्रादेशिक आव्हानांनाही यशस्वीपणे मोडीत काढले आहे, अशा शब्दात बीबीसीने या विजयाचे वर्णन केले आहे.

अमेरिका (न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्र): न्यूयॉर्क टाइम्सने या निकालाला इतिहासाची पुनर्रचना म्हटले आहे. 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात भाजपने मिळवलेला हा विजय मोदींच्या सर्वात मोठ्या टीकाकारांपैकी एक असलेल्या ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत करणारा आहे, असे अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हटले आहे.

बांगलादेश (ढाका ट्रिब्यून वृत्तपत्र): शेजारील देश बांगलादेशातील ढाका ट्रिब्यूननेही यावर भाष्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये भाजप आपले पहिले सरकार स्थापन करून इतिहास रचणार आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने तृणमूलसमोर मोठे आव्हान उभे केले आणि त्यात यश मिळवले, असे बांगलादेशातील ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्राने म्हटले आहे.

दरम्यान या विजयामुळे भाजपची राष्ट्रीय पातळीवरील पकड अधिक घट्ट झाली आहे. तसेच प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. विशेष सघन सुधारणा (SIR) कायद्यांतर्गत झालेल्या विक्रमी मतदानाने बंगालच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग