AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Luggage Booking Cost: रेल्वेच्या वतीने सुरु केलेल्या नव्या सुविधेनुसार तुम्ही देखील ट्रेनमध्ये चढण्याआधी ऑनलाईन लगेज बुक करु शकता. मात्र स्थानकात पोहचल्यानंतर लगेजचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.

Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
INDIAN RAILWAY
| Updated on: Aug 21, 2026 | 4:33 PM
Share

How To Book Online Luggage: भारतीय रेल्वे हे सर्वात स्वस्तात निर्धोकपणे प्रवास करण्याचे साधन आहे. आता रेल्वेने स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि धावपळ कमी करण्यासाठी ऑनलाईन लगेज बुकींगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळणार आहे. तिकीट बुकींगसोबत सुरु केलेल्या एक्स्ट्रा लगेजला डिक्लेअर आणि बुक करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु केल्याने रेल्वेच्या पार्सल कार्यालयात रांगा लावण्यापासून सुटका मिळणार आहे. या पावलाने कागदी कारवाईतून प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे देशांच्या महत्वाच्या स्थानकांवर विनाकारण होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहेत.

रेल्वेने या ऑनलाईन सर्व्हीसला ३१ जुलैपासून सुरु केले आहे. रेल्वे बोर्डाच्या वतीने या सेवेला सुरु करण्यासाठी सर्व झोनल रेल्वेना पत्र पाठवून आधीच कळवण्यात आले आहे. या ऑनलाईन लगेज बुकींगच्या सेवेचा फायदा केवळ कन्फर्म तिकीट धारकांनाच मिळणार आहे. चला तर पाहूयात या सेवेचा लाभ नेमका कसा घ्यायचा ते..

सर्वात आधी रेल्वेच्या लगेज संबंधीत अधिकृत बेवसाईट www.parcel.indianrail.gov.in लॉग इन करावे.

येथे तुमचा ट्रेनचा नंबर, प्रवासाची तारीख , गंतव्य स्थानक आणि पार्सल संबंधित माहिती द्यावी

या प्रोसेस नंतर पोर्टल तुम्हाला ऑटोमेटिक पद्धतीने अंदाजित भाडे सांगले.

प्रवाशाला ऑनलाईन अर्जाची प्रिंट घेऊन स्थानकात सामानाच्या वजनाचे अंतिम व्हेरिफिकेश करु शकता.

पेमेंट मिळाल्यानंतर रिसिट द्वारे ( गंतव्य स्थानकात) प्रवासाच्या अखेरच्या स्थानकात तुमचे सामान तुम्ही घेऊ शकता.

तसेच ट्रॅक एंड ट्रेस सर्व्हीस आणि SMS द्वारे सामानाची लाईव्ह लोकेशन देखील माहिती करुन घेता येते.

कॅटगरीच्या हिशेबाने लगेज घेऊन जाण्याची मर्यादा काय ?

रेल्वेने प्रत्येक क्लासच्या प्रवाशांसाठी फ्री आणि कमाल लगेजची मर्यादा निश्चित केली आहे. सेंकड क्लास ( जनरल ) मध्ये ३५ किलो फ्री आणि एक्स्ट्रा चार्ज सोबत ७० किलो सामान घेऊन जाऊ शकता.

स्लीपरमध्ये फ्री लिमिट ४० किलो आणि कमाल मर्यादा ८० किलो आहे. एसी-३ टियर आणि एसी चेअर कारसाठी फ्री आणि कमाल मर्यादा ४० किलो ठेवली आहे.येथे एक्स्ट्रा लगेजची अनुमती नाही.

फर्स्ट एसीमध्ये ७० किलो फ्री आणि कमाल १५० किलोपर्यंत ल‍िम‍िट ठेवण्यात आली आहे. सेकंड एसीमध्ये ५० किलो फ्री आणि कमाल १०० किलोपर्यंत लगेज घेऊन जाता येते.

किमान अंतर आणि शुल्काशी संबंधित नियम

एक्स्ट्रा लगेजवर स्टँडर्ड लगेज रेटच्या दीड पट चार्ज लावला जाईल. कमीत कमी ३० रुपयांचा चार्ज निश्चित केलेला आहे. याची कॅल्युकेशन १० किलोच्या स्लॅबमध्ये जाईल. याशिवाय कॅल्युकेशन साठी किमान ५० किलोमीटर अंतराचा नियम लागू असेल.

Follow Us
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?