AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रासह राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे कारण काय? कधी होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार

मोदी सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यातच राज्यातील सत्तांतर झालं आणि त्यानंतर आता शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपद आता मिळणार आहे.

केंद्रासह राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे कारण काय? कधी होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 14, 2023 | 9:59 AM
Share

संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली   : राज्यासह केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion ) हा लांबणीवर पडला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या वतिने शिंदे गटाला दोन मंत्रीपद दिले जाणार आहे. त्यातच सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे गटासह ठाकरे गटाची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission ) देखील निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरुन सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगात संघर्ष सुरू असल्यानं हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. फेब्रुवारी अखेर हा वाद मिटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र राज्यासह केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर पडलेला आहे. यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारचा ही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

यामध्ये शिंदे गटाच्या दोन खासदारांना एक मंत्री पद आणि एक राज्यमंत्री पद दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा स्वरूपाची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यातच राज्यातील सत्तांतर झालं आणि त्यानंतर आता शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपद आता मिळणार आहे.

यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. केंद्रातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा स्वरूपाची देखील माहिती समोर येत आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेना कुणाची धनुष्यबान चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगामध्ये सध्या निर्णय प्रलंबित आहे. दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला असला तरी याबाबत निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय दिलेला नाही.

निर्णय राखून ठेवल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. याशिवाय राज्यातील सत्तांतराच्या संदर्भातही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. असे दोन्ही निकाल प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

भाजपसोबत शिवसेना पक्षाची युती असतांना शिवसेना केंद्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्रीपदे होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीत शिवसेना गेल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.

शिवसेनाला जे स्थान केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान होते तेच स्थान आता शिंदे गटाला देखील दिले जाणार आहे. हे जवळपास निश्चित असले तरी दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल न दिल्याने ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ