AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या सीएमच्या ताफ्यात घुसली रॉन्ग साईडने येणारी कार, सात पोलिसांसह नऊ जण जखमी

रॉन्ग साईडने येणाऱ्या कारमुळे अनेकदा जीवघेणे अपघात झालेले आहेत. आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्‍यांचा ताफा जात असताना रॉन्ग साईडने अचानक कार घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेत सात पोलिसांसह नऊ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानच्या सीएमच्या ताफ्यात घुसली  रॉन्ग साईडने येणारी कार, सात पोलिसांसह नऊ जण जखमी
| Updated on: Dec 11, 2024 | 6:28 PM
Share

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कारच्या ताफ्यात एक रॉन्ग साईडने येणारी कार घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारच्या जोरदार धडकेने पोलिसांसह नऊ जण जखमी झाले असून सुदैवाने मुख्यमंत्री भजनलाल यांना काही झालेले नाही. त्यांनी स्वत:च या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात जयपूरातील जगतपुरा एनआरआय सर्कल जवळ घडला आहे. येथून मुख्यमंत्री भजनलाल यांच्या गाड्यांच्या ताफा जात असताना अचानक रॉन्ग साईडने एक कार ताफ्यात घुसली आणि तिने अनेकांना कारना धडक दिली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की रॉंन्ग साईडने येणाऱ्या या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.या अपघातात सात पोलिसासह नऊ जण जखमी झाले आहेत. या कारमधील दोन जण जखमी झाले आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्‍यांनी प्रवासापूर्वी इतर वाहनांसाठी रस्ता बंद केला नव्हता म्हणून हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. वास्तविक सीएम भजनलाल यांनी व्हिआयपी रुट लाईन घेण्यास मनाई केली होती. त्यांच्या ताफ्याने सर्वसामान्य लोकांना त्रास नको म्हणून त्यांनी असे केले होते.त्यामुळे सर्वसामान्य वाहनांची वर्दळ सुरुच होती. आणि त्यातूनच सीएमनी आपला ताफा काढला होता.

मुख्यमंत्र्यांनी जखमींना रुग्णालयात नेले

रॉन्गसाईडने आलेल्या कारने टक्कर मारल्यानंतर सीएम भजनलाल कारमधून उतरले आणि त्यांनी जखमीची विचारपूस करीत काळजी घेतली, त्याच्या ताफ्यातील सात पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. तसेच टक्कर मारणाऱ्या कारमधील दोन जण जखमी झाले होते. यावेळी  सीएम भजनलाल यांनी गंभीर जखमींना तातडीने आपल्या सोबत रुग्णालयात नेले आणि भरती केले.

पोलीसांचा तपास सुरु

या अपघातानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी संबंधित कारला ताब्यात घेतले आहे. या कारचा चालक देखील जखमी झाला आहे. पोलिस आता या प्रकरणात चूक कशी झाली याचा तपास करीत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी सीएमचा ताफा जात असताना सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र मार्गिका करण्यास मनाई केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कारना थांबविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रॉन्ग साई़डने येणाऱ्या कारने धडक मारल्याचे उघड झाले आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!