AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी डॉक्टरला लागला भलताच नाद, बिकिनी घालून करायचा असं काही…, बायकोने दाखवलेला व्हिडीओ पाहून पोलीसही हादरले

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. एका डॉक्टराचा नको त्या अवस्थेमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात त्याच्याच पत्नीने आरोप केला आहे.

सरकारी डॉक्टरला लागला भलताच नाद, बिकिनी घालून करायचा असं काही..., बायकोने दाखवलेला व्हिडीओ पाहून पोलीसही हादरले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 23, 2025 | 4:26 PM
Share

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. इथे एका डॉक्टरवर स्वत: तृतीयपंथी असल्याचं दाखवून अश्लील व्हिडीओ तयार करून ते व्हिडीओ ऑनलाईन विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा आरोप दुसरा-तिसरा कोणी केला नसून त्याच्याच पत्नीनं केला आहे.

घटनेबाबत अधिका माहिती अशी की हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगर येथील आहे. संत कबीर नगरमधल्या जिल्हा जेल परिसरात असलेल्या सरकारी निवासस्थानामध्ये हा डॉक्टर राहातो. वरुनेश दुबे असं या डॉक्टरचं नाव आहे. वरुनेश दुबे याची पत्नी सिंपी पांडे हिनेच आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. माझा पती तृतीयपंथीयांचा पेहराव करून अश्लील व्हिडीओ बनवतो आणि नंतर तो ते व्हिडीओ पैशांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर विकतो असा दावा त्याच्या पत्नीनं केला आहे. या डॉक्टरच्या पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. सिंपी पांडेनं असा देखील दावा केला आहे की, मी माझ्या पतीला एका पुरुषासोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं.घराची सजावट त्याच्या हातात असेली अंगठी आणि घटनास्थळी असलेलं बॅकग्राउंड पाहून मला खात्री पटली की हे आपलंच घर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सिंपीनं 18 मे रोजी याबाबत आपल्या पतीकडे विचारणा केली तर तिचा डॉक्टर पती तिच्यावर चांगलाच भडकला, तिला मारहाण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं, त्यानंतर सिंपीनं घडलेली घटना आपला भाऊ आणि वडिलांना सांगितली. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे. सिंपीनं आपला पती वरुनेश दुबे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्य घेतलं आहे. पोलिसांनी डॉक्टर दुबेचं घर सील केलं आहे. तसेच या प्रकरणात एका उच्चस्थरीय समितीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. या डॉक्टरच्या त्या व्हिडीओची आता फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या डॉक्टरविरोधात शारिरीक आणि मानसिक छळ, फसवणूक अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर दुसरीकडे डॉक्टर दुबे याने आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ फेक असल्याचा दावा त्याने केला आहे. हा मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं त्याने म्हटलं आहे.माझ्या पत्नीसोबतच माझे काही नातेवाईक देखील मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा मला संशय आहे. एका प्रतिष्ठिती डॉक्टरचा असा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं तेथील स्थानिक नागरिकांना देखील प्रचंड धक्का बसला आहे. संबंधित घटनेचा तपास सुरू आहे, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे, हे लवकरच समोर येईल, त्यानंतर पुढील कारवाई करू असं या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी