AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सैन्याला मिळणार अनोखा मित्र, फायटर जेटसोबत शत्रूंवर हल्ला करणार, काय आहे कॅट्स-वॉरियर?

पहिल्यांदा एअरो इंडिया 2025 मध्ये कॅट्स-वॉरियर हे ड्रोन दाखवण्यात आले होते. डिसेंबर 2025 पर्यंत हे भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात एचएएल सोबत न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नोलॉजीजसुद्धा काम करत आहे.

भारतीय सैन्याला मिळणार अनोखा मित्र, फायटर जेटसोबत शत्रूंवर हल्ला करणार, काय आहे कॅट्स-वॉरियर?
| Updated on: Jul 21, 2025 | 12:18 PM
Share

CATS Warrior: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) एक खास ड्रोन तयार केला आहे. त्याचे नाव कॅट्स-वॉरियर (CATS) आहे. हे साधारण ड्रोन नाही. शत्रूंची झोप उडवणारे ड्रोन आहे. हे पायलट नसणारे लढाऊ विमान आहे. तेजससारख्या फायटर जेटसोबत उड्डाण करुन शत्रूंवर हल्ला करणारे हे ड्रोन आहे. हे ड्रोन स्वत: शत्रूची माहिती काढणार असून देखरेख करणे आणि हल्ला करण्यासाठी सक्षम असणार आहे. त्याची चाचणी लवकरच करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा एयरो इंडिया 2025 मध्ये हे ड्रोन दाखवण्यात आले होते. डिसेंबर 2025 पर्यंत हे भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात एचएएल सोबत न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नोलॉजीजसुद्धा काम करत आहे. जगातील मोठे देश अमेरिका, रशिया, चीनसुद्धा असे ड्रोन बनवले जाणार आहेत. आता भारतसुद्धा या तंत्रज्ञानाने आपले हवाईदल अधिक सक्षम करत आहे.

CATS वॉरियर UCAV ची वैशिष्ट्ये काय?

CATS वॉरियर मानवरहित लढाऊ ड्रोन आहे. त्यात पायलट बसत नाही. हे रिमोटने किंवा स्वत: मिशन पूर्ण करतो. हे ड्रोन फायटर जेटसोबत उडवले जाणार आहे. त्यामुळे पायलट असणाऱ्या विमानांना त्याचा पाठिंबा मिळू शकतो. शत्रूच्या रडारला चकवणे, आधीच हल्ला करणे, स्वार्म टेक्नोलॉजी ज्यामध्ये असे ड्रोन झुंडमध्ये उडून शत्रूच्या प्रणालीला फसवतात, हेरगिरी करणे, देखरेख करणे आणि हल्ला करणे ही कामे हे ड्रोन करु शकतो. त्याला स्टील्थ डिजाइन केलेले आहे. त्यामुळे शत्रूंच्या रडार त्याला पकडू शकत नाही. त्याची ऑपरेशन रेंजचे अंतिम आकडे चाचणीनंतर मिळणार आहे.

एचएएलनुसार, कॅट्स वॉरियरचे वजन जवळपास दोन टन आहे. ते 9000 मीटर उंचीवरुन उडू शकतो. तसेच 300 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मोठा हल्ला करु शकतो. त्यामधून क्षेपणास्त्र आणि बॉम्ब दोन्ही घेऊन जाता येतात. शत्रूच्या प्रदेशात दूरपर्यंत जाऊन तो हल्ला करु शकतो. शत्रूची रडार सिस्टम जाम करुन गरज पडल्यावर त्यावर हल्ला करण्यातही हे ड्रोन सक्षम आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.