AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकिस्तान रात्री 1 वाजता युद्ध… CDS अनिल चौहान यांनी सांगितली Inside Story

Operation Sindoor : भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना 7 ते 10 मे च्या रात्री भारत-पाकिस्तानमध्ये जो लष्करी संघर्ष झाला, त्याची इनसाइड स्टोरी सांगितली. युद्धाच्या काळात प्रोफेशनल फोर्सेस कसा विचार करतात ते सुद्धा त्यांनी सांगितलं.

Operation Sindoor : पाकिस्तान रात्री 1 वाजता युद्ध... CDS अनिल चौहान यांनी सांगितली Inside Story
anil chauhan
| Updated on: Jun 03, 2025 | 5:14 PM
Share

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पुणे विश्वविद्यालयात ‘भविष्यात युद्ध आणि युद्धकला’ या विषयावर व्याख्यान दिलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. भारताने 48 तासांची लढाई 8 तासातच पूर्ण केल्याच त्यांनी सांगितलं. याच दरम्यान पाकिस्तानने चर्चेचा प्रस्ताव दिला. हे ऑपरेशन आपल्याला दाखवतं की, युद्ध केवळ स्ट्राइक नाही, तर राजकारणाचा सुद्धा भाग आहे. सीडीएस चौहान यांच्यानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्ध आणि राजकारण एकत्र सुरु होतं. “आमच्याकडे चांगली काऊंटर ड्रोन सिस्टिम होती, त्याचा फायदा झाला. 10 मे च्या रात्री 1 वाजताच पाकिस्तान युद्ध हरला होता. 48 तासाची लढाई आम्ही 8 तासातच संपवली होती. त्यांनी फोन उचलला व चर्चा करण्यास तयार झाले” असं सीडीएस अनिल चौहान म्हणाले.

“आम्ही प्रोफेशनल फोर्सेस आहोत. आमच्यावर नुकसान आणि झटक्यांचा परिणाम होत नाही. चुका समजून सुधारल्या पाहिजेत. मागे फिरु नये” असं सीडीएस चौहान म्हणाले. “युद्धामध्ये नुकसानीपेक्षा रिझल्ट जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूर एका अशा युद्धनितीच उदहारण होतं, जिथे कायनॅटिक आणि नॉन-कायनॅटिक दोन्ही प्रकारच्या युद्ध कौशल्याचा वापर झाला” असं सीडीएस अनिल चौहान म्हणाले.

कुठलीही धमकी सहन करणार नाही

सीडीएस चौहान यांनी पाकिस्तानला दहशतवादावरुन पुन्हा एकदा वॉर्निंग दिली. पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं, की भारत कुठल्याही प्रकारची धमकी सहन करणार नाही. भारताची ड्रोन क्षमता पाकिस्तानच्या तुलनेत खूप जास्त प्रभावी आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. “आजच युद्ध हे पारंपारिक शक्ती प्रयोगापर्यंत मर्यादीत नाही. विविध कूटनितीक, सूचनात्मक सैन्य आणि आर्थिक उपकरणांच्या माध्यमातून राजकीय उद्देश साध्य करण्याची प्रक्रिया आहे” असं सीडीएस म्हणाले. कुठल्याही प्रकारच्या युद्धात दोन महत्त्वाची तत्व असतात. हिंसा आणि हिंसेमागच राजकारण. राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी हिंसेची गरज असते.

अनिल चौहान यांच्या मुलाखतीवरुन वादळ

सीडीएस अनिल चौहान यांनी नुकतीच सिंगापूर येथे ब्लूमबर्ग आणि रॉयटर्सला मुलाखत दिली. त्यावरुन भारतात राजकीय वादळ निर्माण झालं. त्यांनी सुरुवातीला भारताला हवाई नुकसान झाल्याच सांगितलं. पण नंतर चूक सुधारुन पाकिस्तानात खोलवर प्रहार केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावरुन भारतात मोठा गदारोळ झाला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.