Cds bipin rawat death : हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही मृत्यू

बिपीन रावत ज्या व्याख्यानासाठी गेले होते, त्या व्याखानाला त्यांच्या पत्नी मधुलिका रावत याही गेल्या होत्या. त्याही बिपीन रावत यांच्यासोबत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे.

Cds bipin rawat death : हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 6:34 PM

तामिळनाडू :  आजचा दिवस देशासाठी आणि भारतीय सैन्यसाठी काळा दिवस ठरला आहे. कारण आज तामिळनाडूत झालेल्य हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचाच मृत्यू झालाय. फक्त बिपीन रावतच नाही तर सेनेतील इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही या अपघातात देशाने गावमलं आहे. त्यामुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बिपीन रावत यांच्या निधनाची माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.

मधुलिका रावत यांचाही मृत्यू

बिपीन रावत ज्या व्याख्यानासाठी गेले होते, त्या व्याखानाला त्यांच्या पत्नी मधुलिका रावत याही गेल्या होत्या. त्याही बिपीन रावत यांच्यासोबत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअर फाऊंडेशनशीह जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या अनेक कार्यक्रमात सीडीएस बिपीन रावत यांच्याबरोबर दिसून येत असत.

अपघातात आणखी 11 लोकांचा मृत्यू

या अपघातात देशाने आपला सीडीएस तर गमावला आहेच, पण देशाने आणखी 11 लोक या गमावले आहेत. बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि त्यांच्यासह आणखी 11 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याआधी 2015 मध्येही बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. मात्र त्यातून ते मरणाला मात देऊन वाचला होते. मात्र तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातातून ते वाचू शकले नाहीत. या सर्व अधिकाऱ्यांच्या मृत्यूने देशावर सध्या शोककळा पसरली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह सर्वांनी या दुर्घटनेनंतर शोक आणि हळहळ व्यक्त केली आहे. हळहळ व्यक्त करत राजनाथ सिंह, अमित शाह तसेच राहुल गांधी यांनीही ट्विट करून हळहळ व्यक्त केली आहे.

BJP vs Shiv Sena : खुर्ची उचलण्यावरून भाजपा-शिवसेनेत ‘सामना’, भातखळकरांच्या ट्विटवर सामंत म्हणाले…

मेरी बहन को मारा म्हणत चाकूनेच भोसकलं, औरंगाबादमधील कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर गंभीर जखमी!

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.