AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुही जात कंची? कोविडची लस घेतली का? आणि… जनगणनेसाठी केंद्राचे 40 सवाल

केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेसाठी 40 प्रश्न अधिसूचित केले आहेत. यात जात, अनुसूचित जाती/जमाती आणि कोविड लसीकरण स्थितीबद्दल माहिती विचारली जाईल. देशाची ही पहिली डिजिटल जनगणना असून, नागरिक मोबाईल ॲपद्वारे माहिती देऊ शकतील. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून, जातवार आकडेवारी मोठ्या प्रमाणावर संकलित केली जाणार आहे.

तुही जात कंची? कोविडची लस घेतली का? आणि... जनगणनेसाठी केंद्राचे 40 सवाल
Census 2027Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 12:16 PM
Share

केंद्र सरकारने जनगणना 2027साठी लोकसंख्या गणनेसाठी एकूण 40 प्रश्नांना अधिसूचित केलं आहे. या प्रश्नांमध्ये जात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीशी संबंधित माहितींचा समावेश आहे. त्याशिवाय तुम्ही कोविडची लस घेतली का? कुठे घेतली वगैरे माहितीही विचारली जाणार आहे. त्यामुळे जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या एकूण 40 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार लोकांना तुम्ही अनुसूचित जाती वा अनुसूचित जमातीशी संबंधित आहे की नाही? असा सवाल केला जाणार आहे. तसेच असाल तर तुमची जात कोणती? असाही सवाल केला जाणार आहे. जनगणना 2027मध्ये पहिल्यांदाच व्यापक स्तरावर जातिनिहाय आकडे मिळवण्यात येणार आहेत.

थंड प्रदेशात 1 सप्टेंबरपासून गणना

लडाख आणि जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या थंड प्रदेशात येत्या 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना होणार आहे. यापूर्वी 17 ते 31 ऑगस्टपर्यंत लोकांना स्वत:हून ऑनलाईन माहिती देण्यासाठीची सुविधा दिली जाणार आहे.

देशाच्या बाकी भागांमध्ये फेब्रुवारी 2027 पासून जनगणना करण्यात येणार आहे. जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर आणि निवासाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची जनसांख्यिकीय आणि सामाजिक आर्थिक माहिती घेतली जाणार आहे.

स्वातंत्र्यानंतर आठवी जनगणना

जनगणना 2027मध्ये देशाची 16 गणना होणार आहे. तसेच स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना होणार आहे. ही पहिली डीजिटल जनगणना असणार आहे. त्यात मोबाईलद्वारे आकडे मिळवण्याचा आणि स्वत:ची माहिती भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. 2021मध्ये जनगणना होणार होती. पण कोव्हिडमुळे होणार झाली नव्हती.

कोणते प्रश्न विचारण्यात येणार?

या जनगणनेत एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यात नाव, गाव, वैवाहिक माहिती, विवाहाच्या वेळेचं वय, राष्ट्रीयता, धर्म, अनुसूचित जाती किंवा जमातीतून आहात का? असाल तर तुमची जात कोणती? आईवडिलांची माहिती, मातृभाषा, अवगत असणाऱ्या भाषा, कामकाजाची माहिती, प्रवासाचं ठिकाण, मुलांची संख्या, कोव्हिड लसीकरणाची माहिती, एकूण बँक खाती, मोबाईल नंबर, आधार नंबर, पासपोर्ट नंबर आणि इतर माहिती विचारली जाणार आहे.

Follow Us
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं