AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission : दरमहिन्याला येईल इतका पैसा, जमा होईल महागाई भत्ता

7th Pay Commission : दरमहिन्याला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतकी वाढ होईल. त्यांच्यासाठी लवकरच आनंदवार्ता येऊ शकते.

7th Pay Commission : दरमहिन्याला येईल इतका पैसा, जमा होईल महागाई भत्ता
| Updated on: Jun 02, 2023 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मे महिना संपल्याने आनंदवार्ता येऊन धडकू शकते. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता (7th Pay Commission DA Hike) मिळेल, हा आकडा स्पष्ट होईल. एप्रिल महिन्यात हे स्पष्ट झाले होते की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना यावेळी डीएमध्ये किती वाढ होईल. एप्रिलच्या आधारावर AICPI इंडेक्सच्या आकड्यांमध्ये आता चांगलीच उसळी दिसून आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांहून 46 टक्के होण्याची दाट शक्यता आहे. महागाई भत्ता (DA Hike) 42 टक्के आहे. जानेवारीपासून तो लागू करण्यात आला आहे. महागाई भत्त्यासाठी 3 महिन्यांचे आकडे हाती येतील आणि चित्र स्पष्ट होईल.

4 टक्के वाढीचे भाकित मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय झाला. पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी 2023 पासून तो लागू करण्यात आला. जुलै 2023 मध्ये महागाई भत्ता जाहीर करण्यात येईल. AICPI निर्देशांक हे गणित अवलंबून आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा निर्णय होऊ शकतो.

वर्षांतून होते दोनदा वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते. दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

AICPI निर्देशांकावर सर्व गणित कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.

AICPI अशी वाढ यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत फेब्रुवारी महिन्यात AICPI चे आकडे घसरले होते. इतर महिन्यात हा आकडे सातत्याने वाढत होते. जानेवारी 2023 मध्ये AICPI इंडेक्स 132.8 अंक होता. फेब्रुवारीत तो 132.7 टक्क्यांवर घसरला. एप्रिल महिन्यात AICPI इंडेक्स 134.02 अंकावर पोहचला.

AICPI-IW मध्ये चढउतार कामगार आयोगाने तीन महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, जानेवारीत या निर्देशांकात तेजी होती. फेब्रुवारी महिन्यात त्यात घसरण झाली. मात्र, मार्चमध्ये पुन्हा एकदा निर्देशांकाने उसळी घेतली. निर्देशांक 132.7 अंकांवरून 133.3 अंकांवर पोहोचला आहे. एकूण 0.6 अंकांची वाढ झाली. महिन्याच्या आधारावर निर्देशांकाने 0.45 टक्क्यांची उसळी घेतली. जानेवारीत 43.08 टक्के, फेब्रुवारीत 43.79 टक्के आणि मार्चमध्ये 44.46 टक्के महागाई भत्ता मिळाला होता. आता एप्रिलमध्ये त्यात किती वाढ होईल, हे 31 मे रोजी जाहीर होणार आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.