तुमच्याही राज्यात पसरलाय का H3N2 विषाणू ? जाणून घ्या कोणाला याचा सर्वाधिक धोका; केंद्राचं काय म्हणणं आहे ?

H3N2 विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले.

तुमच्याही राज्यात पसरलाय का H3N2 विषाणू ? जाणून घ्या कोणाला याचा सर्वाधिक धोका; केंद्राचं काय म्हणणं आहे ?
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:25 AM

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाची दहशत कमी होऊन लोकं सुखाने श्वास घेत असतानाच आता H3N2 (इन्फ्लूएंझा) विषाणूने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. देशभरात या व्हायरसची (virus) लागण झालेल्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कर्नाटक व हरियाणा येथे या आजाराचे रुग्ण आढळले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने या व्हायरसबाबत निवेदन जारी केले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry)दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 9 मार्चपर्यंत इन्फ्लूएंझा विषाणूच्या विविध प्रकारांची एकूण 3038 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी जानेवारीमध्ये 1245 आणि फेब्रुवारीमध्ये 1307 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय मार्चमध्ये 486 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये H3N2 प्रकरणांचाही समावेश आहे.

त्याच वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना मनसुख मांडविया म्हणाले की, भारत सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य उपायांमध्ये वाढ करण्यासाठी राज्यांसोबत काम करत आहे.

दरम्यान, H3N2 बद्दल सरकारने काय माहिती दिली ती जाणून घेऊया –

हे सुद्धा वाचा

1) इन्फ्लूएंझाच्या विषाणूमुळे होणारे हे सीझनल इन्फ्लूएंझा रेस्पिरेटरी इन्फेक्शन (श्वसन संसर्ग) आहे. जगातील सर्व भागांवर याचा प्रभाव पडतो.

2) भारतात हंगामी इन्फ्लूएंझाचे दोन टप्पे असतात, पहिली जानेवारी ते मार्च आणि दुसरा टप्पा मान्सूननंतर सुरू होतो. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसतो, जे इतर आजारांनी ग्रासलेले असतात.

3) सध्या सुरू असलेल्या हंगामी इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची संख्या मार्चपासून कमी होण्यास सुरुवात होईल. H3N2 इन्फ्लूएंझा बद्दल सांगताना, कर्नाटक आणि हरियाणा या दोन्ही राज्यांनी प्रत्येकी एका मृत्यूची पुष्टी केली आहे.

4) आतापर्यंत, इन्फ्लूएंझा A (H1N1pdm09), इन्फ्लूएंझा A (H3N2) आणि इन्फ्लूएंझा बी (व्हिक्टोरिया) भारतात आढळून आले आहेत. आतापर्यंत इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांपैकी H3N2 इन्फ्लूएंझा हा मुख्य असल्याचे आढळले.

5) दर इतर इन्फ्लूएंझा प्रकारांपेक्षा H3N2 ग्रस्त रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा दर जास्त आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) ने Oseltamivir या औषधाची शिफारस केली आहे.

6) ज्यांना H3N2 ची लागण झाली आहे, त्यापैकी 10 टक्के लोकांना गंभीर रेस्पिरेचरी इन्फ्लूएंझा आहे आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तर 7 टक्के लोकांना आयसीयूची आवश्यकता आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या सांगण्यावनुसार, H3N2 संक्रमित रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारखी लक्षणं जाणवतात. यावेळी फ्लू असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत आहे. याचं संक्रमण वेगाने होत असल्याचं दिसून आलं आ

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....