AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिंग झिंग झिंगाट… पुरुषच नाही, महिलाही दारू पिण्यात अव्वल, ‘या’ राज्यातील स्त्रिया सर्वाधिक पिणाऱ्या; सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे मद्यसेवनाच्या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. कोणत्या राज्यात महिला सर्वाधिक दारूचे सेवन करतात? कुठे सर्वाधित पुरुष दारू घेतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

झिंग झिंग झिंगाट... पुरुषच नाही, महिलाही दारू पिण्यात अव्वल, 'या' राज्यातील स्त्रिया सर्वाधिक पिणाऱ्या; सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
कोणत्या राज्यातील महिला करतात सर्वाधिक मद्यसेवन ?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 15, 2025 | 12:00 PM
Share

देशात सर्वात जास्त ( दारू) कोण पितं ? असे प्रश्न तुमच्या डोक्यातही येत असतील. देशात महिला आणि पुरूषांपैकी सर्वात जास्त मद्यसेवन कोण करतं, हे जाणून घेऊया. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने एक सर्वेक्षण केले असून त्यात आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. हा सर्व्हे अतिशय मनोरंजक आहे, ज्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.

देशातील कोणत्या राज्यात दारूचे सर्वाधिक सेवन केलं जातं ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? कोणत्या राज्यात पुरूष किंवा महिला सर्वाधिक दारू पितात? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या एका सर्व्हे रिपोर्टमधून समोर आली आहेत. त्यामध्ये अतिशय हैराण करणारा खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणात ईशान्येकडील राज्ये यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणानुसार, ईशान्य भागातील महिला सर्वाधिक (मद्य) सेवन करतात.

महिलांच्या मद्यसेवनात कोणतं राज्य प्रथम स्थानी ?

या सर्व्हेनुसार, आसाममध्ये महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. देशभरात 15 ते 49 वर्षे वयोगटातील दारू पिणाऱ्या महिलांपैकी केवळ 1.2 टक्के महिला आहेत. त्याच वेळी, आसाममध्ये हा आकडा अनेक पटींनी वाढलेला दिसतो. सर्वेक्षणानुसार, येथे 16.5 टक्के महिला दारूचे सेवन करतात, ज्यामुळे हे राज्य देशातील इतर राज्यांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तर आसामनंतर मेघालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 8.7 टक्के महिला दारू पितात.

कोणत्या राज्यात पुरूष पितात सर्वाधिक दारू ?

यासोबतच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार, महिलांच्या मद्यसेवनाच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 3.3 टक्के महिला दारूचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिक्कीम आणि छत्तीसगड चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत, जिथे 0.3 आणि 0.2 टक्के महिला दारू पितात. कोणत्या राज्यात सर्वाधिक पुरुष दारू पितात हे देखील या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून बरीच रंजक माहिती समोर आली आहे. त्यानुसार अरुणाचल प्रदेशात पुरुष सर्वाधिक दारू पितात. येथे 15 ते 49 वयोगटातील 59 टक्के पुरुष दारूचे सेवन करतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...